वृक्षारोपण, संग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:41+5:302021-02-24T04:11:41+5:30
दरम्यान, या उपक्रमाचे कौतुक करून वृक्षारोपण व संगोपन करून गावसुद्धा सक्षम होऊ शकते, असे गौरवोद्गार खासदार डॉ. अमोल कोल्हे ...
दरम्यान, या उपक्रमाचे कौतुक करून वृक्षारोपण व संगोपन करून गावसुद्धा सक्षम होऊ शकते, असे गौरवोद्गार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.
डिजिटल ग्रामपंचायत कांदळीचे वतीने शिवजयंतीनिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांचे हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा तसेच खासदार कोल्हे यांच्या संकल्पने ग्रामपंचायत कांदळी हद्दीतील अंगणवाड्यांना परसबागेचे किट देण्यात व जिल्हा परिषद शाळांना वॉटर फिल्टर देण्यात आले. या वेळी बाजार समितीचे सभापती संजय काळे, गटनेते व जि. प. सदस्य शरद लेंडे, पं. स. सदस्य शामराव माळी, सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड माजी सरपंच शिवाजी बढे, संतोष बढे, अशोक घोडके, गोविंद बोरचटे, शांताराम घाडगे, सुनील गुंजाळ, मुरलीशेठ गुंजाळ, सुदर्शन बढे -----– , अनिल भोर, मनोज फुलसुंदर, सुरेश कुतळ, गोरक्षनाथ गुंजाळ, सचिन रोकडे, आशा भालेराव, अक्षदा सतीश भोर, सुनंदा गुंजाळ उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके यांनी कांदळी गावाच्या विकासासाठी काहीही कमी पडून देणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी
लोकनियुक्त सरपंच विक्रम भोर यांनी नारळाचे झाड निवडले व गावातील दानशूर व्यक्तीकडून रोपे घेऊन जुलैपर्यंत १००० झाडे संकल्प केला आहे. सूत्रसंचालन सुनील गुंजाळ, स्वागत मुरलीधर गुंजाळ तर सुदर्शन बढे यांनी आभार मानले.
२३ नारायणगाव कांदळी
डिजिटल ग्रामपंचायत कांदळी येथे ३९१ झाडांच्या वृक्षारोपणाचा शुभारंभ करताना अमोल कोल्हे. यावेळी अतुल बेनके, संजय काळे, अशोक घोडके, विक्रम भोर व इतर.