कडेपठार रस्त्यालगत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:34+5:302021-06-06T04:08:34+5:30

पिंपळ, वड, चिंच, गुलमोहर, बदाम, बकूळ आदी प्रकारची शंभर झाडे लावण्यात आली. जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे ...

Plantation along the side plateau road | कडेपठार रस्त्यालगत वृक्षारोपण

कडेपठार रस्त्यालगत वृक्षारोपण

Next

पिंपळ, वड, चिंच, गुलमोहर, बदाम, बकूळ आदी प्रकारची शंभर झाडे लावण्यात आली. जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांचा हस्ते वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली.

या वेळी पालिकेच्या मुख्याधिकारी पूनम कदम, नगरसेविका रुक्मिणी जगताप, नगरसेववक महेश दरेकर, हेंकल लोकटाईट कंपनी, लायन्स क्लब पुणे व रोटरी क्लब सहकारनगरचे प्रमुख डॉ. प्रसाद खंडागळे, कंपनीचे पदाधिकारी हर्षल झगडे, हेमंत बुधे, उदय नवले, प्रदीप खाडे, महेश जाधव,विशाल कापरे,गौरंग गुरव,जेजुरी पालिकेचे अधिकारी संगीता एलमेवार, संध्या जाधव, अपूर्वा जाधव, राजेंद्र गाढवे, बाळासाहेब बगाडे, कन्हैया लाखे, बाळासाहेब खोमणे आदी उपस्थित होते.

या वेळी हेंकलच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वृक्षारोपण, गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, कोरोनाकाळात एक हजारहून अधिक कुटुंबीयांना किराणा किट, पोलीस स्टेशन, दवाखाने, स्मशानभूमी यांना पीपीई किट, मास्क व सॅनिटायझरचे वाटप दौंड, इंदापूर येथील शासकीय रुग्णलयाना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

०५ जेजुरी

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जेजुरी येथे वृक्षारोपण करताना मान्यवर.

Web Title: Plantation along the side plateau road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.