कडूसमध्ये वृक्षारोपण आणि अन्नधान्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:26+5:302021-04-17T04:09:26+5:30
मौजे शिरोली (ता. खेड) येथील मलगेवस्ती, ठाकरवस्ती येथे राबविलेल्या स्तुत्य उपक्रमांचे खेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस अधिकारी राहुल ...
मौजे शिरोली (ता. खेड) येथील मलगेवस्ती, ठाकरवस्ती येथे राबविलेल्या स्तुत्य उपक्रमांचे खेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस अधिकारी राहुल लाड यांनी कौतुक केले. शिरोली येथील ठाकरवस्ती व नजीकच्या ठिकाणी १५० कुटुंबांना तांदूळ, गहू, साखर, चहा पावडर, साबण, कोलगेट, मीठ इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कोविडचा प्रभाव कमी करण्यासाठी साखळी मोडीत काढण्याच्या शासनाच्या प्रयत्नाला सर्वांनी साथ देण्याची विनंती हरिभाई देखणे यांनी केली. या कार्यक्रमाला भोसले (PSI खेड पोलीस स्टेशन) एमएसईबीचे विक्रांत ओव्हाळ, वनसंरक्षक अधिकारी एस. पी. चौधरी, ज्ञानेश्वर बोगाटे, अर्जुन गोडसे, ऋषी वारे, मंगेश सावंत, जयाताई दजगुडे, संजय सावंत, रवींद्र सावंत, राहुल सावंत, निर्मला देखणे, प्रमिला पवळे, शशिकला उमाप, शेखर सावंत, मोहन काळे, बाबू मलगे , जयश्री सावंत आदी उपस्थित होते.
---
फोटो क्रमांक : १६कडूस अन्नवापट
फोटो ओळी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरोली (खेड) येथे वृक्षारोपण व गरजूंना अन्नधान्यांचे वाटप करण्यात आले.