महिलादिनानिमित्त वृक्षारोपन व हिमोग्लोबिन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:36+5:302021-03-10T04:11:36+5:30
मंडळ विंझर संचालित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात विंझर येथील यशस्वी महिला बचत गटाच्या महिलांकडुन महिला दिनानिमित्त ...
मंडळ विंझर संचालित अमृतेश्वर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात विंझर
येथील यशस्वी महिला बचत गटाच्या महिलांकडुन महिला दिनानिमित्त ५० झाडे लावण्यात आली.
यावेळी बचत गटाच्या सदस्या वैजयंता लिम्हण यांनी स्वराज्याच्या मासाहेब जिजाऊ यांचा आदर्श
महिलांनी घ्यावा असे सांगितले.तर बचत गटाच्या अध्यक्षा छबुबाई लिम्हण यांनी वृक्षारोपनाची संकल्पना
मांडली. येथील महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी रुपाली लिम्हण,अंगणवाडी सेविका रंजना लिम्हण,सुमल कुटे,सार्था लिम्हण
प्राध्यापिका सीमा बागुल,प्राध्यापिका अनुजा गावडे,प्राध्यापिका शितल शेंडकर,प्राध्यापिका सुनिता बाठे,समाज शिक्षण मंडळाचे संचालक संभाजी भोसले
प्राचार्य डॅा.संजीव लाटे,डॅा.महादेव डोंगरे,प्रा.योगेश श्रीखंडे,प्रा.विजय कदम,प्रा.परमेश्वर कांबळे,विजय लिम्हण,सदाशिव लिम्हण,समीर भोसले आदीसह
ग्रामस्थ उपस्थित होते. साखर येथील आरोग्य उपकेंद्रात ३१ महिलांची हिमोग्लोबिन व रक्तातील साखर तपासणी करण्यात आली.आरोग्य उपकेद्रातील आरोग्य सेविका
एस.एन.आरुडे,सीएपओ नेहा चौरे,आशा मनीषा करंजकर आदींनी मार्गदर्शन केले.
अमृतेश्वर महाविद्यालय विंझर(ता.वेल्हे) यशस्वी महिला बचत गटाच्या महिलां वृक्षारोपन करताना