पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण मोहिम महत्वाची. : निर्मलाताई पानसरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:51+5:302021-06-24T04:09:51+5:30
खेड तालुक्यातील पश्चिमेकडील कडूस गावात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ...
खेड तालुक्यातील पश्चिमेकडील कडूस गावात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सुपारी, फणस, विविध फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कांचन ढमाले, कडूस गावचे सरपंच निवृत्ती नामदेव नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, सुजाता पचपिंड, ॲड. मनिषा टाकळकर, किसनराव नेहेरे, कांचन उद्योग व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप ढमाले, चेअरमन पंडित मोढवे, देवस्थान अध्यक्ष दत्तात्रय ढमाले, यात्रा कमिटीचे तात्यासाहेब धायबर, गणेश मंडलीक, शहनाज तुरूक, हेमलता खळदकर, सुधा पानमंद, अरुण शिंदे, बारकू गायकवाड, अभिनाथ शेंडे, मारूती जाधव, शिवाजी बंदावणे,सिकंदर तुरूक, ज्ञानेश्वर तुपे, चांगदेव ढमाले, दिलीप ढमाले, हनिफ मोमीन, प्रताप गारगोटे, शशीकिरण कालेकर, अनिकेत धायबर, अनिल जाधव, भावना शेंडे, सुरेखा कड, पुजारी हिरवे, कुमार ढमाले, पंडित पोटे, चंद्रकांत लोहार आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २३ कडूस : पर्यावरणासाठी वृक्षारोपण पानसरे
सोबत फोटो-- कडूसला पुणे जि. परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.