हरित वारी फाउंडेशन कडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:59 AM2021-02-05T04:59:55+5:302021-02-05T04:59:55+5:30
हरित वारी फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांनी या भागात अनेक उपयोगी वृक्षांची लागवड केली होती वृक्षांना पाण्यासाठी ट्रिप व प्लास्टिकची पाच ...
हरित वारी फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांनी या भागात अनेक उपयोगी वृक्षांची लागवड केली होती वृक्षांना पाण्यासाठी ट्रिप व प्लास्टिकची पाच हजार लिटरची पाण्याची टाकी ठेवण्यात आली होती. डोंगराला आग लागली व या आगीत वृक्ष ड्रीप मटेरियल टाकी पूर्णपणे जळून खाक झाली. हरित वारी फाऊंडेशनच्या सदस्यांनी या भागात पुन्हा झाडांना पाणी देण्यासाठी दोन पाईपचे बंडल या भागाला देऊन झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या भागातील पुरंदर व दौंड तालुका यांना जोडणारा नेकलेस पॉईंट हा पर्यटकांना आकर्षित करीत असतो त्यामुळे या भागात पर्यटकांची गर्दी नेहमी होत असते हरीत वारी फाउंडेशनचे सदस्य उमेश रणदिवे, योगेश रणदिवे, दीपक शितोळे, स्वप्नील लोखंडे, चेतन लोखंडे व इतर सदस्यांनी या भागात वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे हे सर्व सदस्य आठवड्यातील एक दिवस भुलेश्वर परिसरात वृक्षांची जोपासना करण्यासाठी येत असतात.
हरित वारी फाउंडेशनच्या सदस्यांनी भुलेश्वर डोंगर परिसरात वृक्ष जगण्यासाठी ड्रीप बंडल भेट दिली.
---