वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:08+5:302021-07-11T04:10:08+5:30
-- ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. ...
--
ओतूर : वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन ओतूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांनी केले.
जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावरील वाटखळ येथे ग्रीन व्हीजन फौंडेशनच्या वतीने माळरानावर, शालेय परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गतवर्षी प्रमाणे यंदाही १ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रीन व्हीजन फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर व सचिव रविंद्र ढमाले यांनी दिली.
फौंडेशनच्या वतीने एक मूल एक झाड, वाढिवस वृक्षारोपण, जंगल निर्मिती संवर्धन, स्थलांतरीत वृक्षारोपण व लागवड योजनेचा वृक्ष दत्तक योजना आदी उपक्रम सातत्याने राबविले. ईको व्हिलेज या संकल्पनेतून शाश्वत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी इको माॅडेल विकसित केले आहे. हे मॉडेल प्रयोगातून बनविले जाते शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊंन मुख्याध्यपकांच्या परवानगीने पर्यावरण पूरक योजनांची माहिती दिली जाते.
यावेळी वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर पवार ,परशुराम खोकले अतुल वाघोले वनविभागाचे कर्मचारी सह्दयर राव पारधी फौंडेशनचे अध्यक्ष संतोष वाळेकर ,सचिव रविंद्र ढमाले ललिता वाळेकर संतोष डुंबरे दीपाली डुंबरे, सुजित नलावडे आदी उपस्थित होते.
- डॉ. श्यामकांत गायकर यांनी आभार मानले .
--