जागतिक शांतता दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:52+5:302021-09-24T04:10:52+5:30
पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हार्टफुलनेसकडून एमआयटी एडीटी विद्यापीठास ...
पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हार्टफुलनेसकडून एमआयटी एडीटी विद्यापीठास ५०० झाडे प्रदान करण्यात आली. त्याचे संगोपन एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून केले जाणार आहे. या कार्यक्रमास एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रभात कुमार सिन्हा, पाहुणे, गौतम बिर्हाडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. महेश चोपडे, प्रा. तेजस कराड, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. कृष्णमूर्ती ठाकूर, श्री. पद्माकर फड, डॉ. अतुल पाटील, संचालक, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, प्रा. अमित त्यागी, डॉ अश्विनी पेठे, डॉ, नचिकेत ठाकूर, प्रा. सुराज भोयर, मोहन मेनन, विभागप्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्यांवर पर्यावरण संवर्धन हा एकमेव पर्याय असून, यापुढील भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यावश्यक असून, यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात होत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.