रोहिडेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:23+5:302021-06-01T04:09:23+5:30
गडकिल्ल्यांवर वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन यासाठी शिक्षक भीमराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी अश्विनी सोनवणे, ...
गडकिल्ल्यांवर वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपन यासाठी शिक्षक भीमराव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी अश्विनी सोनवणे, शंकर धावले, राजेंद्र गुरव उपस्थित होते.
गडकिल्ल्यांवर बाराही महिने शिवप्रेमी पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांना सावली आणि भरपूर ऑॅक्सिजन मिळावा, जैवविविधता वाढावी, पशुपक्ष्यांना निवारा मिळावा, पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, जमिनीची धूप होऊ नये, पर्जन्यमान वाढावे, किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड व्हावी आणि गडकिल्ल्यांची शोभा वाढावी, अशा विविध उद्देशाने देशी झाडांचे जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन वर्षभर चालणारा राष्ट्रमाता राजमाता जिजामातेचं बन हा उपक्रम किल्ल्यावर सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत रायरेश्वर, रोहिडेश्वर आणि राजगड या किल्ल्यांवर वृक्षलागवड करून वृक्षसंगोपन केले जाणार आहे. जून ते सप्टेंबर वृक्षलागवड, ऑक्टोबर ते नोव्हेंबर झाडांना आळी करणे आणि डिसेंबर ते मे झाडांना पाणी घालणे, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शिवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन गडकिल्ल्यावर झाडे लावण्यास सहकार्य करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भीमराव शिंदे यांनी केले आहे.
--
फोटो क्रमांक : ३१ भोर-रोहिडेश्वर किल्ल्यावर वृक्षारोपण ज्योती परिहार व राज्य समन्वयक संगीता घोडेकर यांच्या हस्ते झाले.
फोटो ओळी : रोहिडेश्वर गडावर वृक्षारोपण करताना उपशिक्षणाधिकारी.