शिवाजी विद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:34+5:302021-07-24T04:08:34+5:30
विद्यालयाच्या परिसरात आंबा, जांभूळ, बोर, चिंच आदी फळझाडे तर आवळा, कडूनिंब यांसारखी औषधी वनस्पती आणि रेन-ट्री, वड यांसारखी बहुउपयोगी ...
विद्यालयाच्या परिसरात आंबा, जांभूळ, बोर, चिंच आदी फळझाडे तर आवळा, कडूनिंब यांसारखी औषधी वनस्पती आणि रेन-ट्री, वड यांसारखी बहुउपयोगी झाडे विद्यालयाचे प्राचार्य ए. वाय. काटे, पर्यवेक्षिका व्ही. ए. कौले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. विशेष म्हणजे वृक्षारोपणाच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावून सर्वजण उपस्थित होते.
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन याविषयीची पर्यावरण प्रतिज्ञा देण्यात आली. ‘वृक्ष संवर्धन, काळाची गरज’ याविषयी प्राचार्य काटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
--
फोटो क्रमांक : २३ शेलपिंपळगाव शिवाजी विद्यालय वृक्षारोपण.
फोटो ओळ : शेलपिंपळगाव येथे वृक्षारोपण करताना शिक्षक.