पाषाण सुतारवाडीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:46+5:302021-07-25T04:09:46+5:30
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५१ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. त्या निमित्ताने सुतारवाडी येथील शिवनगर परिसरातील ...
पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५१ हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. त्या निमित्ताने सुतारवाडी येथील शिवनगर परिसरातील महानगरपालिकेच्या जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले. शिवनगर परिसरातील मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले होते. परिसरातील नागरिकांनी सोबत घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी हा परिसरात स्वच्छ करून त्याठिकाणी वृक्षारोपण केले. पुणे महापालिकेचे नगरसेवक आदित्य माळवे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी उद्यान विभागाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी करण्यात येईल, असे सांगितले.
विठ्ठल सुतार, राजेंद्र वाघाचौरे, रणपिसे काका, मयूर सुतार, बाळासाहेब ढोरे, शंकर सुर्वे, विष्णू धुमाळे, प्रवीण आमले, प्रज्वल कोकाटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.