लावलेली झाडे जगणे आवश्यक : भापकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:00+5:302021-08-17T04:16:00+5:30
तालुक्याच्या ग्रामीण भागात पर्यावरणास पूरक अशी वृक्ष लागवड केली आहे. मात्र, लावलेली झाडे जगली जगणे आवश्यक असल्याने बारामती ...
तालुक्याच्या ग्रामीण भागात पर्यावरणास पूरक अशी वृक्ष लागवड केली आहे. मात्र, लावलेली झाडे जगली जगणे आवश्यक असल्याने बारामती तालुक्याच्या भागात झाडांना पाणी देण्यासाठी कायमस्वरूपी मोफत टॅंकरचे नियोजन केले असल्याचे दुर्योधन भापकर यांनी सांगितले. तालुक्याच्या पंचायत समितीच्या मोरगाव गणात येणाऱ्या मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, सायंबाची वाडी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. या गावासाठी देण्यात येणाऱ्या मोफत टॅंकरचा लोकार्पण कार्यक्रम आज तरडोली येथे झाला.
या वेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, तरडोलीचे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भापकर, किसन तांबे, संजय पाटील, बंटी गाडे आदी उपस्थित होते. भापकर यांनी सांगितले की, बारामती तालुक्यामध्ये आपल्या भागात जास्तीत जास्त झाडे जगली पाहिजेत. तसेच गावच्या विकासासाठी कधीही मदतीचा हात देण्याचे आश्वासन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी केले.