अवसरीला नारळाच्या ३०० झाडांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:25+5:302021-09-25T04:11:25+5:30
अवसरी बुद्रुक ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष अनिल हिंगे पाटील आणि वैभव हिंगे यांनी मंचर-पारगाव रस्त्याच्या दुतर्फा जेसीबीच्या साहाय्याने झाडेझुडपे काढून ...
अवसरी बुद्रुक ग्रामस्वच्छता समितीचे अध्यक्ष अनिल हिंगे पाटील आणि वैभव हिंगे यांनी मंचर-पारगाव रस्त्याच्या दुतर्फा जेसीबीच्या साहाय्याने झाडेझुडपे काढून टाकली. त्यानंतर मुक्तादेवी तरुण मंडळ व लोकसहभागातून नारळाची १००झाडे लावली. पाण्यासाठी ठिबक सिंचन केले. त्यानंतर सरपंच पवनकुमार हिले, उपसरपंच सचिन हिंगे, वैभव हिंगे पाटील यांनी खालचा शिवार ते रोकडेवस्तीलगत असलेल्या ओढ्यालगत नारळाची ५० झाडे लावली. हिंगेवस्ती ते मुक्तादेवीदरम्यान झाडे लावण्यात आली. गावातील तरुणांनी वाढदिवसाचा खर्च टाळून नारळाची झाडे भेट दिली. सद्य:स्थितीत गावातील रिकाम्या जागेत आणि स्मशानभूमी परिसरात अंदाजे १५० नारळाची झाडे लावण्याचे काम सुरू आहे. सरपंच पवनकुमार हिले, भीमाशंकर कारखान्याचे संचालक ॲड. प्रदीप वळसे पाटील, शांताराम बापू हिंगे, प्रशांत हिंगे, उपसरपंच सचिन हिंगे, अनिल हिंगे पाटील, प्रशांत हिंगे, गणपत हिंगे यांच्या उपस्थितीत झाडे लावण्यात आली. कल्याणराव हिंगे पाटील यांनी ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर नारळाची ३०० झाडे पुरविली.