श्री सौरंग्या डोंगर परिसरात ७५ वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:58+5:302021-08-17T04:15:58+5:30
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन केले पाहिजे. जास्त वर्ष टिकणारे भारतीय प्रजातीचे वृक्ष लावले पाहिजे. तसेच ...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि वसुंधरेचे सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन केले पाहिजे. जास्त वर्ष टिकणारे भारतीय प्रजातीचे वृक्ष लावले पाहिजे. तसेच चिंचेच्या झाडापासून देवस्थानला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे मत तुकाराम वाटेकर यांनी व्यक्त केले.
ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची लागवड करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे मत जि. प. सदस्य बाबाजी काळे यांनी व्यक्त केले. या वेळी भावडी गावचे सरपंच महेश नवले, रवींद्र नवले, कुमुद अरगडे, सरपंच जगन्नाथ राक्षे, उपसरपंच शिंदे, उद्योजक रोहिदास पवळे, पोलीस पाटील गोरक्ष नवले, कोंडीभाऊ अरगडे, सौरंग्या देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, नातेवाईक आदी उपस्थित होते. शिवाजी नवले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे.