अजानवृक्षाचे ज्ञानदेवांच्या कर्मभूमीत रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:24 AM2021-01-13T04:24:16+5:302021-01-13T04:24:16+5:30
अजानवृक्षाचे रोप हे आळंदी येथील सिद्धबेटातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी श्री ...
अजानवृक्षाचे रोप हे आळंदी येथील सिद्धबेटातील (ज्ञानदेवांची जन्मभूमी, लीलाभूमी, कर्मभूमी) मूळ अजानवृक्षापासून तयार करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा चे विश्वस्त रामभाऊ जगताप, ह.भ.प. शिवाजीमहाराज देशमुख; अध्यक्ष माधवराव दरंदले; सेवेकरी शिवाजी होण, भय्या कावरे, बायोस्फिअर्सचे अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर; शिवाजीराव मोरे आदी उपस्थित होते.
पुणेकर म्हणाले,‘‘ बायोस्फिअर्स संस्थेच्या माध्यमातून ‘माऊली हरित अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे श्री. संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधीवर असलेला ज्ञानवृक्ष-अजानवृक्ष सर्वदूर (योग्य त्या ठिकाणी) पोहचवणे होय. संत साहित्याचा अभ्यास केला असता श्री संत ज्ञानेश्वर माऊली व अजानवृक्ष यांचे दृढ नाते लक्षात येते. श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी देखील समाधिस्त होण्यापूर्वी जो दंड रोवला होता तो देखील याच सिद्धबेटातील अजानवृक्षाचा होता. यावरून माऊलींची संजीवन समाधी व अजानवृक्ष हे एक समीकरणच झाले आहे. जनमानसात योग्य ती सकारात्मकता यावी या उद्देशाने अजानवृक्ष आता सर्वदूर करीत आहोत.’’