नारायणगावात शंभर रोपांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:11+5:302021-06-02T04:10:11+5:30
ग्रामपंचायत वारूळवाडी परिसरात प्रसिद्ध हृदयरोग व सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, उज्ज्वला मुंडलिक, रोहिनी संजय शिंदे, रंगनाथ गोल्हार यांच्या वाढदिवसाचे ...
ग्रामपंचायत वारूळवाडी परिसरात प्रसिद्ध हृदयरोग व सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, उज्ज्वला मुंडलिक, रोहिनी संजय शिंदे, रंगनाथ गोल्हार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वतीने बकुळ, नीलमोहर, करंज, सीताशोक, रेनट्री, वड, पिंपळ अशी निसर्गाला पूरक अशी १०० झाडांचे वृक्षारोपण आज (दि. १ जून) वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या परिसरातील जागेत करण्यात आले.
या वेळी सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच योगेश पाटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद झगडे, उपसरपंच माया डोंगरे, जंगल कोल्हे, ज्योती संते, राजश्री काळे, डॉ. पल्लवी राऊत, प्रोजेक्ट इन्चार्ज दीपक वारुळे, जितेंद्र गुंजाळ, मनोज भळगट, संपत शिंदे, मछिंद्र मुंडलिक, विश्वास भालेकर, संजय शिंदे, बंडू करपे, अजय चोरडिया, नरेंद्र गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद झगडे व प्रोजेक्ट इन्चार्ज दीपक वारुळे म्हणाले की, १ जूनपासून वर्षभर जुन्नर तालुक्यात “झाडे लावा झाडे जगवा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या मनुष्याला ऑक्सिजन व पाण्याचे महत्त्व कळायला लागले आहे. झाडामुळे वातारणात ऑक्सिजनची निर्मिती होत असल्याने यापुढे आपल्याला झाडाचे महत्त्व काय असते हे कळणार आहे. ज्या परिसरात झाडाचे प्रमाण जास्त असते, त्या परिसरातील वातावरण चांगले व शुद्ध असते. पावसाचे प्रमाणही वाढते. येत्या ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त वारूळवाडी परिसरात वृक्षारोपण केले जाणार आहे.
--
फोटो क्रमांक : ०१ नारायणगावात वृक्षारोपण
फोटो ओळी : लायन्स व लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने वारूळवाडीत वृक्षारोपण करताना पदाधिकारी.
===Photopath===
010621\01pun_1_01062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : ०१ नारायणगावात वृक्षारोपणफोटो ओळी : लायन्स व लिओ क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने वारूळवाडीत वृक्षारोपण करातना पदाधिकारी