‘आनंदवन’मध्ये देशी झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:55+5:302021-07-19T04:08:55+5:30
'द अर्बन फॉरेस्ट मूव्हमेंट' या संस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक फ्लॅशमोब आयोजित केला होता. ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’चे ...
'द अर्बन फॉरेस्ट मूव्हमेंट' या संस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी हा एक फ्लॅशमोब आयोजित केला होता. ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’चे संस्थापक विंग कमांडर पुनीत शर्मा यांनी त्यासाठी सहकार्य केले. एनआयबीएम रस्त्याच्या परिसरात वन विभागाची मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून ‘एव्हीएमएम’तर्फे आनंदवन उभारण्यात येत आहे. त्यांच्यासोबत आता ‘स्वच्छ पुणे स्वच्छ भारत’ ही संस्थाही जोडली गेली आहे. संपूर्ण देशी झाडांची लागवड या ठिकाणी केली जात आहे.
याविषयी पुनीत शर्मा म्हणाले, ‘‘अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम ‘एव्हीएमएम’ तर्फे राबविला जात आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आहे. त्यांच्यासोबत आम्हीही वन विभागाच्या मोकळ्या जागेत आनंदवन उभारण्यासाठी मदत करत आहोत. नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला हवे.’’