सणसवाडीत देशी झाडांचे केले रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:10 AM2021-09-03T04:10:32+5:302021-09-03T04:10:32+5:30
वड, पिंपळ, चिंच, आंबा, सिसम यांसह अन्य देशी झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले ...
वड, पिंपळ, चिंच, आंबा, सिसम यांसह अन्य देशी झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. याप्रसंगी सरपंच सुनंदा दरेकर, उपसरपंच ॲड. विजयराज दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, खरेदी-विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, उद्योजक हरिष येवले-पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर दरेकर, राजेंद्र दरेकर, दत्ताभाऊ नामदेव हरगुडे, शशिकला सातपुते, स्नेहल भुजबळ, ललिता दरेकर, संगीता हरगुडे, संगीता दरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य कुंदाबाई हरगुडे, सुनिता उत्तम दरेकर, माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे, गोरक्ष भुजबळ, उद्योजक नवनाथ हरगुडे, नवनाथ दरेकर, हिरामण दरेकर, नीलेश दरेकर, उत्तम दरेकर, विहान दरेकर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर म्हणाले की, आमदार अशोक पवार यांनी सामाजिक उपक्रम राबवीत वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला आहे. तर आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशी झाडांचे रोपण करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे सरपंच सुनीता दरेकर यांनी सांगितले.
०२ कोरेगाव भीमा वृक्षारोपण
सणसवाडी येथे वृक्षारोपण करताना मान्यवर.