डोंगरातील भूस्खलन रोखण्यासाठी वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:56+5:302021-09-08T04:13:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : पावसाळ्यात डोंगराचे होणारे भूस्खलन रोखण्यासाठी डोंगर उतारावर चिंच, आंबा, जांभूळ या वृक्षाच्या बियांचे सीडबाॅल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : पावसाळ्यात डोंगराचे होणारे भूस्खलन रोखण्यासाठी डोंगर उतारावर चिंच, आंबा, जांभूळ या वृक्षाच्या बियांचे सीडबाॅल तसेच प्रत्यक्ष वृक्षलागवड करण्यात आली. भोर शहरातील चौपाटी येथील जवाहर कुस्ती संकुलाच्या पैलवानांनी हा उपक्रम राबविला आहे.
दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती वाहून जाऊन डोंगराचे भूस्खलन होण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीची धूप होऊ नये यासाठी भोर शहरातील जवाहन कृस्ती संकुलाचे मार्गदर्शक सुनील शेटे, संदीप शेटे व राहुल शेटे यांनी संकुलातील लहान लहान पैलवानांना घेऊन चिंच, आंबा, जांभूळ या बियांचे पाच हजार सीडबाॅल तयार करून भोरदरा डोंगरात नेऊन टाकले. या शिवाय भोर-महाड रस्त्यावरील हिर्डोशी भागातील डोंगरात सीडबाॅल टाकण्यात आले आहेत. भूस्खलन रोखण्याकरिता भारतीय वृक्षांच्या बियांचे सीडबॉल करून डोंगर उतारावर टाकण्याचा उपक्रम भोर तालुक्यातील जवाहर कुस्ती संकुलाच्या वतीने राबविण्यात आला. चिंच, आंबा, जांभूळ वृक्षांच्या बिया शेणामातीत मिश्रण करून पाच हजार सीडबॉल कुस्ती संकुल तील पैलवानांनी डोंगर पायथ्याशी टाकले आहे. त्यांच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही संकल्पना संदीप शेटे यांनी मांडली होती. तर या उपक्रमासाठी मार्गदर्शन सुनील शेटे आणि राहुल शेटे उपस्थित होते.
चौकट
पावसामुळे डोंगरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन रस्ते घरे शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी डोंगर उतारावर बियाचे सीडबाॅल तयार करून टाकल्याने भविष्यात वृक्ष तयार होऊन उत्खलन होणार नाही. म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे सुनील शेटे व संदीप शेटे यांनी सांगितले.