चाकण नगरपरिषदच्या माध्यमातून वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:08 AM2021-07-26T04:08:50+5:302021-07-26T04:08:50+5:30
''माझी वसुंधरा'' अभियानांतर्गत चाकण पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत भारतीय प्रजातीची एक हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याप्रमाणे ...
''माझी वसुंधरा'' अभियानांतर्गत चाकण पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत भारतीय प्रजातीची एक हजार वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याप्रमाणे पालिका हद्दीत नुकतीच वृक्षलागवड करण्यात आली. या वेळी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, उपमुख्याधिकारी आर.जे. पांढरपट्टे, माजी नगरसेवक प्रकाश गोरे, रोनक गोरे यांच्यासह उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धनाची हरित शपथ देण्यात आली.
आतापर्यंत सातशे वृक्षांची लागवड नगरपरिषद हद्दीतील पठारवाडी,पानसरेमळा, काळूस रोड,रोहकल रोड,बिरदवडी रोड,आगरवाडी,तुकाईनगर आदी भागात केली आहे.यात प्रामुख्याने कडुनिंब,गुलमोहर,वड आणि पिंपळसारख्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांना प्राधान्य देण्यात आले आहे.पालिका हद्दीत हरीतकरण वाढविण्यासाठी उद्याने संवर्धन व सौंदर्यीकरण, रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण यासारखे उपक्रम सुरू आहे.लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पालिकेने उचलली आहे.
250721\screenshot_20210724-165857_video player.jpg
चाकण नगरपरिषदच्या वतीने वृक्षारोपण करताना