Plastic Ban : पुणेकरांनी प्रशासनाचे ऐकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:30 AM2018-06-24T03:30:03+5:302018-06-24T03:30:07+5:30
पुणे : प्लॅस्टिकबंदी कायद्यातंर्गत प्लॅस्टिक वापराच्या पहिल्याच गुन्ह्यासाठी तरतूद केलेला ५ हजार रुपयांचा दंड कमी करून २०० रुपये करावा,अशी मागणी बारा बलुतेदार समाज विकास संघाने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. नोटाबंदीनंतर सामान्यांचे हाल झाले, आता प्लॅस्टिकबंदीनंतर अनेक लघुउद्योजकांचे हाल होत आहेत. कसलाही पर्याय न देता सरकारने ही बंदी लागू केली आहे. ती पर्यावरणाच्या हिताची असली तरी नागरिकांच्या खिशाला इतका मोठा भुर्दंड लावणे अयोग्य असल्याचे मत संघाने व्यक्त केले आहे. पुणे : प्रशासनाने एखादा नियम जाहीर करायचा अवकाश की त्याच्याविरोधात बंड करून उठणाऱ्या पुणेकरांनी मात्र प्लॅस्टिकबंदीला हिरवा कंदील दाखवला आहे. बंदीचे स्वागत करून प्लॅस्टिक पिशवीऐवजी कापडी पिशव्या घेऊन खरेदीला निघालेल्या पुणेकरांची गर्दी आता दिसू लागली आहे. निदान प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवसाला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरील विक्रेत्यांनी काही अंशी सहकार्य केले असले तरी व्यापाºयांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहवयास मिळाले.
राज्यभरात शनिवारपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली आणि ही बंदी हटविण्यास न्यायालयाने नकार दिल्याने नागरिक, विक्रेते, व्यापारी, उद्योजक या सर्वांना प्लॅस्टिकबंदीचे पालन करणे अनिवार्य आहे, असा आदेश प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. प्लॅस्टिकबंदीच्या आदेशाचे शहरात संमिश्र प्रतिसादात स्वागत करण्यात आले. खरेदीसाठी मोठी बाजारपेठ समजल्या जाणाºया बोहरी आळीत प्लॅस्टिकबंदी सर्वांच्या कुतुहलाचा विषय होता. अनेक व्यापाºयांना नेमक्या कुठल्या प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी आहे, याबद्दल माहिती नसल्याचे दिसून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्रास सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आल्याने त्यांना ग्राहकांना समजून सांगण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागले. ग्राहकदेखील त्यांच्याशी वाद घालत वस्तु खरेदी केल्यानंतर ती नेण्यासाठी प्लॅस्टिक पिशवीच्या मागणीसाठी अडून बसल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये नजरेस पडत होते. दुसरीकडे दुकानांमध्ये खरेदी झाल्यानंतर काही ग्राहक आपल्या कापडी पिशव्यांमध्ये वस्तू ठेवत होते. किराणा मालाच्या दुकानात मात्र चित्र वेगळे होते. डाळ, तेल, मसाला, कडधान्ये, आदी वस्तू नेण्याकरिता दुकानदारांना नाईलाजाने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करावा लागत होता. या विषयी किराणा व भुसार मालाचे व्यापारी पारस परमार यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाने प्लॅस्टिकबंदी केली हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्यावरील नेमके उपाय काय असावेत, याविषयी ग्राहक आणि व्यापारी यांच्या मनात साशंकता आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे छोटा व्यापारी मात्र तोट्यात जाणार असून केवळ ब्रँड प्रॉडक्टवरील प्लॅस्टिकबंदी कायम ठेवून दुसºया वस्तुंवरील पँकेजिंगमधील प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. ब्रँडच्या नावाखाली छोट्या व्यापाºयांना संपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. सरकारने अगोदर नेमक्या कुठल्या प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी आहे, कशातून काय विकावे, यावर शासनाने आपली भूमिका ठामपणे व्यक्त केल्यास त्यानुसार अंमलबजावणी करण्यास सोपे होईल.