Plastic Ban : तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद, तुमची लाडकी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:33 AM2018-06-24T03:33:49+5:302018-06-24T03:33:51+5:30

‘‘आज मी काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत

Plastic Ban: Thank you for the love you have given, your loved ones ... | Plastic Ban : तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद, तुमची लाडकी...

Plastic Ban : तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद, तुमची लाडकी...

Next

पुणे : ‘‘आज मी काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत. पण आयुष्यात असे प्रसंग येतात की, आपल्याला एकमेकांपासून दूर जाणे भाग पडते. मला वाटत नाही मी परत येईन. भविष्यात कधी चुकून भेट झालीच तर मला जरूर ओळख दाखवा. आतापर्यंत तुम्ही जे मला प्रेमं दिलं त्याबद्दल धन्यवाद. तुमची लाडकी... प्लॅस्टिक पिशवी.’’
कालपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजने प्लॅस्टिकबंदीबाबत नागरिकांना भलतेच जागृत केले आहे. तर विक्रेता, व्यापारी वर्गाला सावधानतेचे संकेत दिले आहेत. यासारख्या अनेक मेसेजेस, पोस्ट सोशल माध्यमांमध्ये लोकप्रिय होत असून प्लॅस्टिकबंदीचा प्रचार अन् प्रसार करमणुकीतून होताना पाहवयास मिळत आहे. हल्ली कुठलीही बंदी असो, सक्ती असो, नियमांची पायमल्ली असो किंवा आदेशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केलेली गळचेपी असो या सर्वांची खिल्ली उडविणाºया पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायचा टेÑंड भलताच लोकप्रिय होत आहे. मार्मिक शेरेबाजीने प्लॅस्टिकबंदीचे स्वागत आणि त्यावर नाराजी व्यक्त होत असून त्यासंबंधीचे विनोदी लेखन सोशल माध्यमांवर वाचायला मिळत आहे. दैनंदिन वस्तू आणण्यासाठी ज्या प्लॅस्टिक पिशवीचा आधार इतक्या वर्षांपासून सर्वसामान्य माणसाला होता आता तो इतक्या तातडीने गेल्याने नागरिकांना वस्तू कशात घ्यायच्या, न्यायच्या हा प्रश्न सतावत आहे. तसेच काहींनी शासनाच्या प्लॅस्टिकबंदी या भूमिकेचे स्वागत केले असून थोड्याच दिवसांत कागद आणि कापडाचे भाव कसे वाढतील, याकडे लक्ष वेधले आहे. प्लॅस्टिकबंदी केली खरी; मात्र त्यावरील उपाययोजना हव्या तितक्या प्रभावीपणे अमलात आणण्याकरिता काय करावे लागेल, याविषयी कुणीच काही सांगत नाही. काही खानपानाच्या वस्तू आणण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्यांची गरज असताना अशावेळी कापडी पिशव्या किंवा भांड्यांचा वापर करायचा का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत. प्लॅस्टिकबंदीचे साधक-बाधक पद्धतीने स्वागत होत असताना ती प्रत्यक्षात कृतीत आणताना ज्या व्यापक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहेत ते होताना दिसत नसल्याची खंत तरुणांकडून सोशल माध्यमांद्वारे व्यक्त केली जात आहे. कपडे, भाजीपाला, क्रॉकरी, शोभेच्या वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू, सजावटीच्या सामानाची ने-आण करण्याकरिता काय वापरावे, असा प्रश्न विचारला जात असून बºयाच पोस्ट दैनंदिन व्यवहारात सातत्याने वापरल्या जाणाºया साधनांविषयक आहेत.

अनेकांनी यावेळी देखील सरकारला नावे ठेवली असून त्यांच्या बंदीधोरणाविषयक नकारात्मकता व्यक्त केली आहे. बंदी आणताना पर्यायही द्यायला हवा होता. प्रत्यक्षात कारवाई करताना तो लगेचच होईल, ही अपेक्षा चुकीची आहे. अशा आशयाच्या पोस्टदेखील सोशल माध्यमांवर चर्चेत आहे. नागरिकांनी बंदीचे स्वागत केले असून नोटाबंदीप्रमाणे या बंदीला सामोरे जाताना काही थोडाफार त्रास सहन करावा लागेल. शेवटी ते सर्वांच्या फायद्याचेच आहे, असा सूर आळवला.

Web Title: Plastic Ban: Thank you for the love you have given, your loved ones ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.