एक एप्रिलपासून उरुळी कांचनला प्लॅस्टिकबंदी
By admin | Published: March 21, 2017 05:05 AM2017-03-21T05:05:32+5:302017-03-21T05:05:32+5:30
येथे १ एप्रिल २०१७ पासून प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दुकानदारांना अगोदरच सूचनापत्र देण्यास सुरुवात
उरुळी कांचन : येथे १ एप्रिल २०१७ पासून प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी दुकानदारांना अगोदरच सूचनापत्र देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे जो कोणी व्यापारी वा नागरिक १ एप्रिल २०१७ पासून प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरेल वा वापरणारास मदत करेल, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच सुनील कांचन व ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी दिली.
उरुळी कांचन येथील ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप दर रविवारी एक ते दीड तास गावातील एक वार्ड-रस्ता स्वच्छ करतात. या त्यांच्या उपक्रमाला १ जानेवारीला १ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गावातील सर्व शाळांमध्ये जाऊन कचरा साठविण्याबाबत व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याविषयी माहिती सांगून विद्यार्थी प्रबोधन करण्यात आले व प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून मोफत कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)