पुण्यासह 'या' १४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 17:11 IST2024-12-29T17:11:03+5:302024-12-29T17:11:16+5:30

वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, रेल्वे प्रशासनाचे आवाहन

Platform ticket sales closed for 4 days at these 14 railway stations including Pune; What is the exact reason? | पुण्यासह 'या' १४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; नेमकं कारण काय?

पुण्यासह 'या' १४ रेल्वे स्थानकांवर ४ दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद; नेमकं कारण काय?

पुणे: वर्षाअखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांची प्रचंड गर्दी होण्याच्या शक्यता असल्याने मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लादले आहेत. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी (दि. २) जानेवारी २०२५च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा, या हेतूने सदर निर्बंधांमधून विशेष सूट देण्यात येत आहे. वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Platform ticket sales closed for 4 days at these 14 railway stations including Pune; What is the exact reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.