नाटकाची ङिांग चित्रपटात नाही

By admin | Published: October 12, 2014 12:03 AM2014-10-12T00:03:13+5:302014-10-12T00:03:13+5:30

लोकांना अनेक छंद असतात; पण ते जोपासणो कठीण असते. नाटकाचे 186क् प्रयोग केल्यानंतरही ती ङिांग पुन्हा अनुभवाशी वाटते.

The play is not in the film | नाटकाची ङिांग चित्रपटात नाही

नाटकाची ङिांग चित्रपटात नाही

Next
>पुणो : लोकांना अनेक छंद असतात; पण ते जोपासणो कठीण असते. नाटकाचे 186क् प्रयोग केल्यानंतरही ती ङिांग पुन्हा अनुभवाशी वाटते. आम्हीही छंदिष्ट असतो. नाटकात जी ङिांग असते ती चित्रपटात नाही, असे म्हणत अभिनेता नाना पाटेकर यांनी पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 
केळकर कुटुंबीयांतर्फे पहिला संग्राहक दिनकर केळकर स्मृती छंदवेध पुरस्कार शनिवारी पाटेकर यांच्या हस्ते गाण्यांचे संग्राहक के.एल. पांडे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 
याप्रसंगी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती गो.बं. देगलूरकर, राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉ. श्रीकांत केळकर, सुधन्वा रानडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘आपलं घर’चे संस्थापक विजय फळणीकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, पुणो सायकल प्रतिष्ठानचे दत्तात्रय मेहेंदळे व विद्या सहकारी बँकेचे संचालक विद्याधर अनास्कर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 
नाना पाटेकर म्हणाले, ‘‘आधी समाजच एक कुटुंब असायचे. आता ही भावना लोप पावली आहे, असे वाटते. गेले ते दिवस, असा निराशावादी सूर असतो. मात्र आजही सगळ्या जुन्या गोष्टी, लहानपण जे हरवले आहे ते आपल्याला पुन्हा हवे असते. एखाद्या छंदातून ते मिळत असते. म्हणूनच केळकर संग्रहालयाशी माङो नाते जुळते. संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहण्याआधी त्यामागची नि:स्पृह भावना कळल्यानंतर ते पाहणो अधिक आनंददायी वाटते.’’ नेत्रदान करण्याची इच्छा आहे; मात्र सद्यस्थिती पाहता पुढे या डोळ्यांना काय पाहायला मिळेल? असा सवाल पाटेकर यांनी या वेळी व्यक्त केला.
डॉ. श्रीकांत केळकर यांनी छायाचित्रंच्या माध्यमातून केळकर कुटुंबीयांचा प्रवास उलगडला. या वेळी बोंगीरवार, देगलूरकर व सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. स्मिता आठवले यांनी आभार मानले. 
(प्रतिनिधी)
 
¨हंदी चित्रपट गीतातील शाीय संगीताच्या समावेशाचा शोध घेताना, अधिकाधिक ज्ञान मिळत गेले. त्याचा शोध घेण्याची इच्छादेखील झाली. 
- के. एल. पांडे, संग्राहक
 
आजकाल पैसा कमविणो, हीच महत्त्वाकांक्षा बनली आहे. आपली आवड, छंदाला कमी लेखले जाते. मात्र हे छंद अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री 

Web Title: The play is not in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.