खेळाडूने जिंकण्याच्या इच्छाशक्तीमुळे कोरोनाला हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:09 AM2021-05-30T04:09:42+5:302021-05-30T04:09:42+5:30
राज्याचे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्याचे नाव आहे. रूपेश मोरे, चाळीस दिवस उपचार घेत असताना यमासोबत स्पर्धा करावी लागली. अखेर माझ्या ...
राज्याचे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्याचे नाव आहे. रूपेश मोरे, चाळीस दिवस उपचार घेत असताना यमासोबत स्पर्धा करावी लागली. अखेर माझ्या जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे मी यमाला हरवून जिंकलो आहे, मत मोरे यांनी व्यक्त केले.
हडपसर भेकराईनगर येथे हॅन्डबॉल क्रीडा मार्गदर्शक रूपेश मोरे (वय ४०), त्यांची पत्नी उषा मोरे यादेखील हॅन्डबॉल खेळाडू आहे. ४३ दिवस कोरोनासोबत लढा दिल्यानंतर रूपेश मोरे यांनी सांगितले. ८ एप्रिलला या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली. रूपेश यांनी अगोदर पत्नी उषा यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून नंतर स्वतः दाखल झाले.
पत्नी दहा दिवसांत बरी झाली. मात्र मोरे यांचा स्कोर वाढतच होता. डॉक्टर सर्व प्रयत्न करत होते. सर्व प्रकारची इंजेक्शनही देण्यात आले होते. मात्र पंधरा दिवस उलटूनही स्कोअर कमी होत नव्हता. माझ्या आजूबाजूला असलेल्या इतर रुग्णांचा परिणाम होत होता. मन खचून जात होते, असे सांगून मोरे म्हणाले की, खेळाच्या मैदानावर अनेक मॅच जिंकलो होतो. त्यामुळे कोरोनाच्या स्पर्धेत आपल्याला जिंकलेच पाहिजे हा एकच ध्यास मनात होता.
मात्र स्कोअर वाढत असल्याने डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यावेळी २५ दिवस झाले होते. पोस्ट कोविडबाबत उपचार चालू होते. यामधून शक्यतो रुग्ण बरा होत नाही, असे बाहेरील डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र मनात जिंकण्याची इच्छा असेल तर बरे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हा लहानपणी गुरूने दिलेला गुरूमंत्र प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. मी बरा होणार, मी बरा होणारच असे म्हणत औषधाला प्रतिसाद देत गेलो आणि हळूहळू २९ दिवसानंतर प्रकृती सुधारत गेली आणि अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले.
नोबेलचे खान सर, डॉ. जितेंद्र देशमुख, भाऊ सतिश जगताप व अभिजित कदम आणि माझे कुटुंब यांनी दिवसरात्र माझी काळजी घेतली.