यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लगावला ‘सुवर्ण चौकार’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:19 AM2019-01-10T00:19:57+5:302019-01-10T00:20:34+5:30

खेलो इंडिया २०१९ : वेटलिफ्टिंगमध्ये ३ तर कुस्तीत एका सुवर्णपदकाची कमाई, दुसऱ्या दिवसअखेर १४ पदके

 Players of Maharashtra hosted 'Golden Chakkar' | यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लगावला ‘सुवर्ण चौकार’

यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लगावला ‘सुवर्ण चौकार’

Next

अमोल मचाले

पुणे : 'खेलो इंडिया यूथ गेम्स २०१९'मध्ये यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसºया दिवशी दमदार कामगिरी करताना सुवर्णपदकांचा चौकार लगावला. आज राज्याच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये ३ तर, कुस्तीत १ सुवर्णपदक आपल्या नावे केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. वेटलिफ्टिंगमध्ये शुभम कोळेकर, अभिषेक महाजन आणि सौम्या दळवी यांनी आपापल्या गटात महाराष्ट्राला सुवर्णपदके जिंकून दिली. २१ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजन गटामध्ये शुभमने २३६ किलो वजन उचलत अव्वल स्थान पटकावले. ओडिशाच्या मुन्ना नायक याने (२३० किलो) रौप्यपदक जिंकले. २२५ किलो वजन उचलणारा महाराष्ट्राचा प्रशांत कोळी कांस्यपदकांचा मानकरी ठरला.

१७ वर्षांखालील मुलींच्या ४० किलो वजन गटात सौम्या दळवीने सुवर्णयश मिळविले. तिने १११ किलो वजन उचलताना आपलीच सहकारी आरती टी. हिला मागे टाकले. १०० किलो वजन उचलणाºया आरतीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलो वजन गटामध्ये अभिषेकने २११ किलो वजन उचलून अव्वल स्थान प्राप्त केले. छत्तीसगडच्या सुभाष एल. याने २०५ किलो वजनासह रौप्यपदक प्राप्त केले. कुस्तीत बुधवारी यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बुधवारी एकूण ५ पदकांची कमाई केली. कोल्हापूरचा मल्ल प्रवीण पाटील याने धडाकेबाज कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले. त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या ५५ किलोखालील वजन गटात अटीतटीच्या अंतिम फेरीत त्याने हरियाणाचा मल्ल ललितवर १०-९ने सरशी साधली.

१७ वर्षांखालील मुलांच्या ९२ किलो वजन गटात महाराष्ट्राचा पृथ्वीराज खडके रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्लीच्या नवीन पुनियाविरुद्धची त्याची लढत एकतर्फी ठरली. यात नवीनने पृथ्वीराजचा १२-०ने धुव्वा उडविला.

अमृत रेडकर आणि कुंदन या राज्याच्या खेळाडूंनी आपापल्या गटांत कांस्यपदक प्राप्त केले. अमृत हा १७ वर्षांखालील मुलांच्या ६५ किलो वजनगटात तेजवीरकडून ४-८ने पराभूत झाला. २१ वर्षांखालील मुलांच्या ६७ किलो वजनगटात झालेल्या उपांत्य लढतीत मलकित हुडा याने कुंदनवर ६-०ने एकतर्फी विजय मिळवला.

ज्ञानेश्वर देसाईचे सुवर्ण हुकले
१७ वर्षांखालील मुलांच्या ५१ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या ज्ञानेश्वर देसाई याचे सुवर्ण थोडक्यात हुकले. अतिशय रंगतदार ठरलेल्या अंतिम लढतीत त्याला मणिपूरच्या के. एल. सिंगकडून ३-४ अशा निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या निर्णायक लढतीत ज्ञानेश्वरने प्रतिस्पध्यार्ला चांगलेच झुंजवले. मात्र निर्णायक क्षणी के. एल. सिंग याने सरस खेळ करीत सुवर्ण आपल्या नावे केले अन् ज्ञानेश्वरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेचे उद्घाटन राजवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, चेअरमन राजेंद्र सिंग, नाडाचे सरसंचालक नवीन अगरवाल, राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, महापौर मुक्ता टिळक यांसह स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडू, क्रीडा विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.


दुसºया दिवशी १२ पदकांची कमाई
खेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्या सत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान थोडक्यात हुकले होते. यंदा ती कसर भरून काढण्याच्या इराद्याने या संघाचे खेळाडू स्पर्धेत उतरले आहेत. दुसºया दिवशी यजमान संघाच्या खेळाडूंनी ४ सुवर्णांसह १२ पदक जिंकत प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला.
महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आज लक्षणीय कामगिरी करताना ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशा भरीव कामगिरीसह ५ पदके जिंकली. कुस्तीतही राज्याच्या मल्लांनी ठसा उमटवताना १ सुवर्ण आणि प्रत्येकी २ रौप्य आणि २ कांस्यपदकांसह ५ पदके जिंकत बुधवारच्या खेळावर छाप पाडली. दुसºया दिवसअखेर महाराष्ट्राने ४ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण १४ पदके जिंकली आहेत.

 

Web Title:  Players of Maharashtra hosted 'Golden Chakkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे