एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 01:12 PM2023-10-07T13:12:17+5:302023-10-07T13:12:51+5:30

यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी लवकर सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे....

Plight of passengers due to movement of ST and Metro, demand to start Shivajinagar bus stand | एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी

एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी

googlenewsNext

पुणे : शिवाजीनगर बसस्थानकातून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागात बस सोडल्या जात होत्या. शिवाजीनगर मध्यवर्ती भागातून जाण्यासाठी प्रवाशांच्या दृष्टीने सोयीचे होते. मात्र मेट्रोच्या कामासाठी एसटीची जागा वाकडेवाडी येथील बसथांबाची जागा भाडेतत्त्वावर वापरण्यात जात आहे. गेल्या चार वर्षांपासून ही जागा हलवली आहे. मात्र येथील काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले तरी अद्याप बसस्थानक उभारण्यात आलेले नाही. शिवाजीनगर बसस्थानकाच्या स्थलांतराचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी लवकर सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

एसटी प्रवाशांना शिवाजीनगर येथून वाकडेवाडी बसस्थानकावर जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना वाकडेवाडी बसस्थानकाकडे जाण्यासाठी पायपीट होत असल्याने प्रवाशांचे हाल होत असून, नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी एसटीच्या प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. परंतु एकमेकांच्या ढकलाढकलीमुळे एसटी प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही प्रशासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

एसटी प्रशासन आणि मेट्रोच्या समन्वयाच्या अभावामुळे शिवाजीनगर बसस्थानकाचे काम रखडले आहे. यामुळे दिवाळीत शिवाजीनगर बसस्थानक सुरू करणे गरजेचे आहे. वाकडेवाडी बसस्थानक येथे जाण्यासाठी पायपीट करावी लागत असून, वाहतूक कोंडीत त्रास सहन करावा लागत आहे.

- गुणवंत रोकडे, प्रवासी

मेट्रोच्या कामासाठी एसटीची जागा वापरण्यात आली आहे. मेट्रोने ठरलेला करार व अटी-शर्थीनुसार काम करून देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.

- कैलास पाटील विभागीय निबंंधक एसी महामंडळ

Web Title: Plight of passengers due to movement of ST and Metro, demand to start Shivajinagar bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.