PM Narendra Modi in Pune: देशाच्या औद्योगिक विकासाला महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने गती दिली: PM मोदी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:17 AM2023-08-01T08:17:32+5:302023-08-01T15:05:23+5:30
PM Narendra Modi in Pune: टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार ...
PM Narendra Modi in Pune: टिळक स्मारक ट्रस्टकडून यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात नरेंद्र मोदींसहशरद पवारही उपस्थित राहणार आहेत. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांच्या उपस्थितीवरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट’च्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुरस्कार सोहळ्याबाबतच्या ताज्या अपडेट्स...
LIVE
02:38 PM
पुणे: महाराष्ट्रात आणखी गतीने विकास करण्यासाठी तीन वेगवेगळे पक्ष एकत्र सत्तेत आलेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:37 PM
पुणे: देशातील जनतेच्या वर्तमानासह भविष्यही चांगले करण्यावर आमचा भर : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:37 PM
पुणे: सत्ता येते आणि जाते, वेळ आणि देश तिथेच असतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:36 PM
पुणे: राज्याच्या विकासातून देशाचा विकास हाच आमचा मंत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:36 PM
पुणे: कर्नाटक सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:34 PM
पुणे: UPA कार्यकाळात २ लाख घरे लोकांनी नाकारली, महाराष्ट्रात त्याचा आकडा ५० हजारांच्या पुढे आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:33 PM
पुणे: २०१४ पर्यंत लाखों घरे बनवली गेली, मात्र याची परिस्थिती एवढी खराब होती की लोकांनी ती घरे नाकारली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:32 PM
पुणे: नीति, नियत आणि निष्ठा देश पुढे नेण्यासाठी अत्यंत आवश्यक, त्यावरच विकास होईल की नाही, हे ठरते : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:32 PM
पुणे: देशाचा पैसा एका पक्षामुळे फुकट जात आहे, त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:30 PM
पुणे: कर्नाटकात ज्या घोषणा करून सरकार बनवले गेले, त्याचे दुष्परिणाम देशाला भोगावे लागत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:29 PM
पुणे: देशाचे अनेक क्षेत्रात युवक प्रगती करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:29 PM
पुणे: जगभरात लोक भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:28 PM
पुणे: महाराष्ट्राचा विकास झाला की देशाचा विकास होईल. तसेच देशाचा जेवढा विकास होईल, तेवढा महाराष्ट्राला फायदा होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:27 PM
पुणे: पर्यावरण संरक्षणासाठी मेट्रोचा विकास महत्त्वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:26 PM
पुणे: देशाच्या औद्योगिक विकासाला महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने गती दिली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:25 PM
पुणे: देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत मोलाचे अन् महत्त्वाचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:24 PM
पुणे: पिंपरी चिंचवड येथे तर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू होत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:24 PM
पुणे: वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेवर काम सुरू आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:24 PM
पुणे: स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयापुरते मर्यादित नाही, घनकचरा व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:23 PM
पुणे: महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे आणखी विस्तारत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:22 PM
पुणे: २०१४ पर्यंत पाच शहरात मेट्रोचे जाळे, आता २० शहरांत मेट्रोचे जाळे विस्तारत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:22 PM
पुणे: देशात ८०० किमी पेक्षा जास्तचे मेट्रोचे काम सुरू आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:21 PM
पुणे: सार्वजनिक वाहतुकीला अद्ययावत करण्याची गरज, यासाठी मेट्रो, मोठे उड्डाणपूल, हायवे यांची निर्मिती होतेय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:19 PM
पुणे: या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी पुणेवासीयांचे अभिनंदन करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:18 PM
पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड भागाला १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:17 PM
पुणे: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर अनेक जण संशोधन करतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:16 PM
पुणे: ऑगस्ट हा उत्सव आणि क्रांतीचा महिना, महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात येण्याचे भाग्य लाभले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
02:08 PM
पुण्यातील विस्तारीत मेट्रो मार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
02:02 PM
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे राज्याला आपण पुढे नेत आहोत, त्यांना अनेक धन्यवाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
02:01 PM
पुणे: केंद्र हे मायबाप सरकार, पंतप्रधान मोदी सढळ हस्ते देत असतात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
02:01 PM
पुणे: सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना, प्रकल्प आणतोय, गेल्या ५०-६० वर्षांत झाले नाही, ते गेल्या ९ वर्षांत होताना पाहतोय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
02:00 PM
पुणे: देशातील जनतेला पंतप्रधान मोदी पुढे नेत आहेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:59 PM
पुणे: राज्याच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारला अजित पवारांनी जोड दिली, आता हे ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या सेवेत कार्यरत आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:58 PM
पुणे: केंद्र सरकारच्या भरीव मदतीमुळे राज्याची सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरू आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:57 PM
पुणे: पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येतात, तेव्हा एक वेगळी प्रेरणा मिळते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:57 PM
पुणे: मुंबईसारखी मेट्रोची सुविधा आणि विकास प्रकल्प पुण्यात आणतोय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:56 PM
पुणे: पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन तसेच अन्य प्रकल्पाचे लोकार्पण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:56 PM
पुणे: लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील सामर्थ्यशाली देश घडवण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करतात, त्यासाठी त्यांना शुभेच्छा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:55 PM
पुणे: लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
01:52 PM
पुणे: पुण्याला रिंगरोड, नवे विमानतळ देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
01:52 PM
पुणे: पंतप्रधान आवास योजनेतील १२ हजार घरांचे हस्तांतरण : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
01:50 PM
पुणे: पंतप्रधान नरेद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुण्याला देशातील सर्वोच्च शहर करू: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
01:49 PM
पुणे: महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
01:46 PM
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन : उपमुख्यमंत्री अजित पवार
01:45 PM
पुणे: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मिळणारे घर कृपा करून विकू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
01:43 PM
देशाच्या विकासाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात : उपमुख्यमंत्री अजित पवार
01:42 PM
पुणे: ट्रिपल इंजिन सरकारचा फायदा राज्यातील सर्व जनतेला व्हावा हीच भावना : उपमुख्यमंत्री अजित पवार
01:41 PM
पुणे: मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले, त्याबाबत आभार: उपमुख्यमंत्री अजित पवार
01:16 PM
पुणे: लोकमान्य टिळकांचे समृद्ध, सशक्त आणि सक्षम भारताचे स्वप्न पूर्ण नक्की पूर्ण केले जाईल : पंतप्रधान मोदी
01:14 PM
पुणे: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे : पंतप्रधान मोदी
01:13 PM
पुणे: कोरोनाची लस तयार करण्यास पुण्याचे महत्त्वाचे योगदान : पंतप्रधान मोदी
01:12 PM
पुणे: एखाद्या रस्त्याला असलेले परदेशी व्यक्तीचे नाव बदलले तरी विरोधक टीका करतात : पंतप्रधान मोदी
01:11 PM
पुणे: कोरोनाच्या संकटकाळात भारताने वैज्ञानिकांवर विश्वास दाखवला, मेड इन इंडिया लस बनवली : पंतप्रधान मोदी
01:09 PM
पुणे: लोकमान्य टिळकांना देशाच्या सामर्थ्यावर विश्वास होता : पंतप्रधान मोदी
01:08 PM
पुणे: लोकमान्य टिळकांनी गीतारहस्याच्या माध्यमातून सोप्या भाषेत कर्मयोग समजावला : पंतप्रधान मोदी
01:07 PM
पुणे: लोकमान्य टिळकांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत: पंतप्रधान मोदी
01:07 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन महाआरती केली
जय गणेश!
— Shrimant Dagdusheth Ganpati (@DagdushethG) August 1, 2023
माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन महाआरती केली.https://t.co/CW7Tnb7MzJ#shrimant#dagdushethhalwaiganpati#shrimantmoraya#shrimantdagdusheth#dagdusheth#dagdushethganpati#pune#maharashtra#devotional#hindupic.twitter.com/3qEN5bOdNG
01:06 PM
पुणे: लोकमान्य टिळकांच्या गुजरातमधील सभेला त्यावेळी ४० हजारांचा जनसमुदाय आला होता : पंतप्रधान मोदी
01:05 PM
पुणे: लोकमान्य टिळकांचे गुजरातसोबत विशेष नाते : पंतप्रधान मोदी
01:02 PM
पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
Speaking at the Lokmanya Tilak National Award Ceremony in Pune. https://t.co/DOk5yilFkg
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023
01:01 PM
पुणे: अनेक युवकांना लोकमान्यांनी सढळ हस्ते मदत केली : पंतप्रधान मोदी
01:01 PM
पुणे: वीर सावरकरांना उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्यास मदत केली : पंतप्रधान मोदी
01:01 PM
पुणे: लोकमान्य टिळकांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यातील सक्षमता ओळखली : पंतप्रधान मोदी
01:00 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् शरद पवारांचा दिलखुलास संवाद, थोपटली पाठ
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् शरद पवारांचा दिलखुलास संवाद, थोपटली पाठ pic.twitter.com/T1GF4ZFwtK
— Lokmat (@lokmat) August 1, 2023
12:58 PM
पुणे: लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा लढा व्यापक करण्यासाठी पत्रकारितेत उतरून केसरी, मराठा सुरू केले : पंतप्रधान मोदी
12:54 PM
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पासाठी देतो: पंतप्रधान मोदी
12:54 PM
पुणे: देशात काशी आणि पुण्याची विशेष ओळख: पंतप्रधान मोदी
12:52 PM
पुणे: कोणताही पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते, विशेषतः लोकमान्यांचे नाव जोडले गेल्यावर अधिक जबाबदारी खांद्यावर आली आहे : पंतप्रधान मोदी
12:52 PM
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशातील १४० कोटी जनतेला समर्पित करतो : पंतप्रधान मोदी
12:50 PM
पुणे: या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार केला, याबाबत आभार व्यक्त करतो : पंतप्रधान मोदी
12:49 PM
पुणे: हा पुरस्कार मिळण्यासाठी या पुण्यभूमीत येण्याचे भाग्य मला लाभले : पंतप्रधान मोदी
12:48 PM
पुणे: लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो : पंतप्रधान मोदी
12:47 PM
पुणे: आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा, आज मी भावनिक झालो आहे : पंतप्रधान मोदी
12:42 PM
पुणे: लोकमान्य टिळक पुरस्काराबाबत पंतप्रधान मोदींचे मनापासून अभिनंदन : शरद पवार
12:42 PM
पुणे: आतापर्यंत अनेक मान्यवरांना लोकमान्य टिळक पुरस्कार, यात पंतप्रधान मोदींच्या नावाचा समावेश : शरद पवार
12:41 PM
पुणे: लोकमान्य टिळक युग आणि महात्मा गांधींचे युग या दोन्ही युगांचे योगदान कधीही विसरले जाऊ शकत नाही: शरद पवार
12:40 PM
पुणे: गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव यामध्ये लोकमान्य टिळकांचे योगदान महत्त्वाचे : शरद पवार
12:39 PM
पुणे: जहाल मतावाद्यांचे प्रतिनिधित्व लोकमान्य टिळकांनी केले : शरद पवार
12:37 PM
पुणे: ब्रिटिशांचा गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी जनतेला जागे केले पाहिजे, ते म्हणजे पत्रकारिता. टिळकांनी २५ व्या वर्षी केसरी सुरू केला : शरद पवार
12:37 PM
पुणे: देशात सर्जिकल स्ट्राइक विषयी बोलले जाते. पण पहिला सर्जिकल स्ट्राइक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यात केला : शरद पवार
12:35 PM
पुणे: देशात अनेक राजे होऊन गेले, मात्र छत्रपती शिवाजी महाराजाचे कार्य वेगळे, ते जनतेचे राजे, रयतेचे राजे होते : शरद पवार
12:34 PM
पुणे: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा ऐतिहासिक भूमीत होतोय: शरद पवार
12:32 PM
पुणे: लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:31 PM
पुणे: जगभरातील महत्त्वाचे नेते पंतप्रधान मोदींकडे विश्वासाने पाहतात, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:31 PM
पुणे: लोकमान्य टिळकांना अपेक्षित ध्येय साध्य करण्यासाठी देशाची वाटचाल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:30 PM
पुणे: शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवक यांच्या जीवनात बदल घडवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:30 PM
पुणे: पंतप्रधान मोदींनी एकदा ठरवले की ते त्याच मार्गावरून जातात. मग ३७० कलम असो, राम मंदिराचा विषय असो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:29 PM
पुणे: ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे भाग्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:28 PM
पुणे: जागतिक स्तरावर १० व्या क्रमांकावरून पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था ५ व्या स्थानी आणली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:28 PM
पुणे: पंतप्रधान मोदींना अनेक देशांनी सन्मानित केले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:26 PM
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:25 PM
पुणे: जागतिक नेते म्हणून नावलौकिक मिळवलेले पंतप्रधान मोदी यांची निवड केल्याबाबत ट्रस्टचे आभार मानतो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:24 PM
पुणे: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:23 PM
पुणे: लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12:15 PM
पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल शरद पवार यांचे विशेष आभार: दीपक टिळक
12:05 PM
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
दीपक टिळक यांच्याकडून पाहुण्यांचे स्वागत आणि सोहळ्याची प्रस्तावना
12:04 PM
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला सुरुवात
11:42 AM
पंतप्रधानांचा ताफा एसपी कॉलेजकडे रवाना
गणपती बाप्पासमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी अभिषेक, पूजन आणि महाआरती केली. यानंतर आता पंतप्रधानांचा ताफा एसपी कॉलेजकडे रवाना झाला आहे.
11:40 AM
"भारत माता की जय! मोदी मोदी..." दगडूशेठ मंदिर परिसरात आगमन झाल्यावर पुणेकरांचा नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष
"भारत माता की जय! मोदी मोदी..." नरेंद्र मोदींचे दगडूशेठ मंदिर परिसरात आगमन झाल्यानंतर पुणेकरांना नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष#Pune#NarendraModipic.twitter.com/gaUuGzMIqZ
— Lokmat (@lokmat) August 1, 2023
11:29 AM
दगडूशेठ गणपती बाप्पासमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारानिमित्त पुणे दौऱ्यावर असून, त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट दिली. गणपती बाप्पासमोर नतमस्तक होत पंतप्रधान मोदी यांनी अभिषेक, पूजन केले.
11:13 AM
अनेक दिग्गजांची दगडूशेठ मंदिराला भेट
फखरुद्दीन अली अहमद यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून भेट दिली होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर आणि इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान नसताना मंदिरात आले होते. नुकतेच गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंदिराला भेट दिली होती. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतीच मंदिरात पूजा केली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान, लता मंगेशकर यांनीही मंदिराला भेट दिली आहे.
11:10 AM
दगडूशेठला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान
भारताचे राष्ट्रपती ते माजी पंतप्रधान आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दगडूशेठ गणपती मंदिराला भेट दिली होती, परंतु नरेंद्र मोदी हे पहिले आहेत, जे मंगळवारी आरती करण्यासाठी विद्यमान पंतप्रधान म्हणून भेट देत आहेत.
11:03 AM
पंतप्रधान मोदी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे रवाना
पुणे विमानतळावर उतरले असून, कृषी महाविद्यालायकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. आता पंतप्रधान मोदी यांचा ताफा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे रवाना झाला आहे.
10:58 AM
लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी शरद पवार रवाना
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले असून, शरद पवार या सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत.
10:49 AM
पंतप्रधान मोदी कृषी महाविद्यालयाकडे रवाना
पुणे विमानतळावर उतरले असून, कृषी महाविद्यालायकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.
10:42 AM
पुण्यात चिमुकल्यांची PM नरेंद्र मोदींना 'वेलकम टू पुणे' चे बोर्ड दाखवून स्वागत करण्याची तयारी
पुण्यात चिमुकल्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'वेलकम टू पुणे' चे बोर्ड दाखवून स्वागत करण्याची तयारी#NarendraModipic.twitter.com/Yr4A0EYnnk
— Lokmat (@lokmat) August 1, 2023
10:37 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी एअर फोर्सच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले आहेत. लोहगाव विमानतळावर मोदींच्या विमानाने लँड केलय. हेलिकॉप्टरने ते पुण्यातील सिंचन नगर मैदानावर उतरणार आहेत. तिथे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री स्वागतासाठी पोहोचले आहेत.
10:31 AM
पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल
टिळक पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल झाले असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांचे स्वागत केले.
10:28 AM
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दाखल
नरेंद्र मोदी ज्या हेलिपॅड वर उतरणार आहेत, त्या हेलिपॅडवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले
09:57 AM
विमानतळावरून पंतप्रधान मोदी थेट हेलिकॉप्टरने पुणे शहरात
पुणे विमानतळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट हेलिकॉप्टरने पुणे शहरात दाखल होणार. त्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
09:50 AM
संभाजी भिडे यांचा पुणे दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली आहे. औरंगाबादहून संभाजी भिडे सांगलीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
09:42 AM
पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा! मणिपूरी नागरिकांनी केला निषेध
PM Narendra Modi: पंतप्रधान परत जा, मणिपूरला जा! मणिपूरी नागरिकांनी केला निषेध #PMModiInPunepic.twitter.com/jWaIg0r22h
— Lokmat (@lokmat) August 1, 2023
09:24 AM
नरेंद्र मोदी ‘चले जाव’ आंदोलन सुरू; इंडिया फ्रंटच्यावतीने पंतप्रधानांचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात येत आहे. सकाळी ९ वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे आंदोलन आता सुरू आहे.
09:05 AM
यंदा प्रथमच टिळक संस्थांच्या बाहेर पुरस्कार सोहळा; परंपरा खंडित
यंदाच्या वर्षी प्रथमच ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ सोहळा टिळक संस्थांच्या बाहेरील ठिकाणी स. प. महाविद्यालय येथे होत असल्याने टिळक संस्थांच्या आवारात कार्यक्रम होण्याची परंपरा खंडित होणार आहे.
08:52 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करून जागतिक पटलावर देशाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. हे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी पंतप्रधान मोदी यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड करण्यात आली.
08:51 AM
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे ४१ वे वर्ष, कोण-कोण राहणार उपस्थित?
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे ४१ वे वर्ष आहे. सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी दिली.
08:25 AM
ठाकरे गटाकडून तीव्र नाराजी
नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे परस्परांचे राजकीय विरोधक आहेत. हे दोन्ही नेते आज एकाच मंचावर येणार आहेत, त्यावेळी ते काय बोलणार याची उत्सुक्ता आहे. शरद पवारांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यावरून ठाकरे गटाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
08:24 AM
पुण्यातील अनेक रस्ते असतील बंद
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
08:24 AM
पुण्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
08:23 AM
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा
सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मोदींचे पुणे विमानतळावर आगमन होईल. सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. ११.४५ वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी १२.४५ वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. शिवाजीनगरच्या ग्राऊंडवर मोदींची सभा होईल.