पंतप्रधान मोदी, तुम्ही आमचे शत्रू आहात- ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 09:27 PM2018-03-10T21:27:55+5:302018-03-10T21:27:55+5:30
आपल्याशिवाय इतरांना संविधानाची काहीच माहितीच नाही, अशा थाटात मोदी वागतात.
पुणे: पंतप्रधान मोदींनी स्वत:च्या डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडं दूर करावीत. तुम्ही शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढवून घेत आहात. तुम्ही आमचे शत्रू आहात, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते शनिवारी पुण्यात तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या डोळ्यावरची आणि बुद्धीवरची झापडं दूर केली पाहिजेत. आजपर्यंतचा इतिहास पाहता तुम्हाला मुस्लिमांविषयी आपुलकी नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्ही तिहेरी तलाक विधेयकाच्यानिमित्ताने शरियतमध्ये ढवळाढवळ करून आमचा रोष ओढवून घेत आहात. तुम्ही आमचे शत्रू आहात, हे तुम्हाला सांगू इच्छितो. मात्र, ही गोष्ट पंतप्रधानांच्या कानापर्यंत पोहोचेल का, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला.
आपल्याशिवाय इतरांना संविधानाची काहीच माहितीच नाही, अशा थाटात मोदी वागतात. सर्व आजारांवर आपल्याकडे औषधे आहेत, असा त्यांचा समज आहे. मात्र, तिहेरी तलाकविरोधी विधेयक हे मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक आहे. आमचा विरोध हा तिहेरी तलाकविरोधातील सुधारणांना नाही, तर तो मोदी सरकारच्या विधेयकाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशात तिहेरी तलाकचे प्रमाण घटले आहे. गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या 3 लाख 40 हजार 206 फतव्यांपैकी फक्त 650 फतवे हे तिहेरी तलाकचे होते. कायदा करून तिहेरी तलाकसारख्या प्रथांना आळा बसणार असेल तर मग हुंडाबळी आणि इतर वाईट प्रथांविरोधातील कायद्यांचे काय? केवळ कायदा केल्याने गुन्हे थांबतात का?, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला. आज आमच्या भगिनींनी आंदोलन करून सरकारला आणि मुस्लिम पुरूषांना इशारा दिला आहे. जेणेकरून मुस्लिम पुरुष शरियतच्या रक्षणासाठी उभे राहतील, असे ओवेसी यांनी सांगितले.
Aaj humari maa aur beheno ne jaloos mein hissa lekar zalim hukumat ko paigam diya aur hum naujawaon ko aur buzurgon ko paigam diya ki aapko bhi khada hona hoga Shariat ke liye: Asaduddin Owaisi, AIMIM in Pune #TripleTalaqBillpic.twitter.com/PtUzdPnpBz
— ANI (@ANI) March 10, 2018
Mr Modi aankhen kholo aur dimaag se apne parde hatao, aap muslim khawateeno ke humdard nahi hain, aap dushman hain humare aur humari nainsaafi ka intezaam kar rahe hain. Magar humare wazir-e-azam sunenge kya?: Asaduddin Owaisi, AIMIM in Pune #TripleTalaqBillpic.twitter.com/Orz2vlePWL
— ANI (@ANI) March 10, 2018