Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:43 PM2024-09-26T12:43:59+5:302024-09-26T12:44:26+5:30

उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे

PM narendra modi Pune visit cancelled Metro service of subway also canceled for passengers, appeal of metro administration | Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन

Pune Metro: पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या मोदींनी आपला दौरा रद्द केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकातून मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. त्यानंतर हि मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होणार होती. पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना उदघाटन समारंभाला येणे शक्य होणार नाही. उदघाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. मेट्रो प्रवासी सेवेत आज जे इतर बदल करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले असून मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. तसंच ते भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

कसा होता पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा?

पंतप्रधान दुपारी ४ वाजता विमानतळावरून शिवाजीनगर मेट्रो स्थानकात येणार होते. तिथून ते मेट्रोने स्वारगेटला जाणार होते. स्वारगेटवरून गाडीने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आल्यानंतर त्यांची जाहीर सभा होणार होती. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचाही समावेश होता. सभेनंतर फर्ग्यूसन महाविद्यालय परिसरात त्यांच्या रोड शोचेही आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: PM narendra modi Pune visit cancelled Metro service of subway also canceled for passengers, appeal of metro administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.