PM Modi In Pune Live: देशाच्या सरकारला युवांच्या सामर्थ्यावर विश्वास- नरेंद्र मोदी
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 10:06 AM2022-03-06T10:06:26+5:302022-03-06T16:23:22+5:30
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत. ...
पुणे-
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. मोदी तब्बल पाच तास आज पुण्यात असणार आहेत. या दरम्यान ते विविध कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. यात पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रोचे उदघाटन, पीएमपीएलच्या १०० ई-बस आणि ई-बस डेपोचं लोकार्पण, एमआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात मोदींची सभा असणार आहे.
PM Modi In Pune Live Updates:
LIVE
03:15 PM
७ वर्षांपूर्वी भारतात फक्त दोन मोबाइल निर्मात्या कंपन्या होत्या- मोदी
"ज्या क्षेत्रात देश आपल्या पायांवर पुढे जाण्याचा विचार करत नव्हता त्यात भारत आज जागतिक लीडर बनण्याच्या मार्गावर आहे. काही वर्षांपूर्वी देशात मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. आपण आयातीवर अवलंबून होतो. आज स्थिती बदलली आहे, मोबाईल निर्मितीत भारत जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. ७ वर्षांपूर्वी भारतात दोन मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या होत्या, आज दोनशे पेक्षा जास्त उत्पादक युनिट आहेत", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
03:10 PM
जगातील सर्वात मोठं स्टार्टअप हब भारतात- मोदी
"स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, आत्मनिर्भर भारत तुम्हाला प्रेरित करत असून आज भारत जगातील सर्वात मोठं स्टार्टअप हब बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आपला समावेश होतो. भारत आज वाढतोय आणि जगावर प्रभाव टाकतोय. कोरोना लसीच्या संदर्भात संपूर्ण जगासमोर भारतानं आपलं सामर्थ्य दाखवून दिलं", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
03:03 PM
"आम्ही कोरोना आणि आता युक्रेनमधील परिस्थिती यशस्वीरित्या हाताळली; युक्रेनमधून आपण आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. इतर मोठ्या देशांनाही असे करण्यात अडचण येत आहे, परंतु भारताचं हेच वाढतं सामर्थ्य आहे की आज हजारो विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे", असं मोदी म्हणाले.
03:00 PM
तरुणाईमुळे देशात बदल- नरेंद्र मोदी
"तुमच्या पिढीला बचावात्मक आणि परावलंबी अनुभवांना सामोरं जाण्याची वेळ आली नाही. यासाठी तुम्ही खरंच भाग्यवान आहात. देशात जो बदल घडला आहे त्याचे श्रेय तुम्हा सर्व तरुणांना द्यायला हवे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
02:57 PM
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सिम्बॉयसिसचं अभिनंदन : नरेंद्र मोदी
"सिम्बॉयसिसच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आरोग्य धाम केंद्राचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला. तुमची शिक्षण संस्था वसुधैव कुटुंबकम या भारताच्या मूळ विचारावर चालते", असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
02:27 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले, सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदींचा सिम्बॉयसिसच्या प्रमुखांकडून सत्कार
02:26 PM
वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे – मोदी
माझी शहरात राहणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
01:26 PM
आधुनिक व्हिजनसह देश पुढे जातोय- नरेंद्र मोदी
इलेक्ट्रीक बस, कार, इलेक्ट्रीक गाड्या, स्मार्ट मोबिलीटी, प्रत्येक शहरात सर्क्युलर इकोनॉमी बेस्ट मॅनेजमेन्ट सिस्टम. आधुनिक सिवेज ट्रीटमेन्ट प्लांट, वेस्ट टू वेस्ट गोबर प्लांट, बायोगॅस प्लांट, एनर्जी, एफिशियन्स, पथदिवे एलईडी, या सगळ्या व्हिजनसह आपण पुढे जात आहोत, असं मोदी म्हणाले.
01:25 PM
मेट्रोने प्रवास करायची सवय लावून घ्या- नरेंद्र मोदी
"नागरिकांनी आता मेट्रोनं प्रवास करायची सवय लावून घ्यायला हवी. आपण जेवढं जास्त मेट्रोनं जाल त्यानं तुमच्याच शहराला फायदा होणार आहे. २१ व्या शतकातील भारताला आपल्याला आधुनिकही बनवायचंय आणि त्याला नव्या सुविधाही जोडायच्या आहेत. भविष्यातील योजना लक्षात घेऊन आपण त्यावर काम करत आहोत", असं मोदी म्हणाले.
01:19 PM
मुळा आणि मुठा नदीला प्रदुषण मुक्त करणार
मुळा, मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी ११०० कोटी देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
01:07 PM
मोदींचा काँग्रेसवर निशाणा
पूर्वी भूमीपूजन व्हायचं पण लोकार्पणाची शाश्वती नसायची; मोदींचा काँग्रेसवर निशाणा
01:04 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत सर्व पुणेकरांचे आभार मानले. तसंच विशेषत: दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
12:56 PM
अजित पवारांची मोदींकडे मागणी
"पिंपरी-स्वारगेट जसं काम सुरु आहे तसं स्वारगेट ते कात्रज… हडपसर ते खराडी…. या दोन मार्गिकेचा अहवाल प्रकल्पाचं काम सुरु आहे. ते काम पूर्ण करुन जसं आताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के राज्य आणि ५० टक्के केंद्राची आहे. १० टक्के मनपाची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरु करण्यासाठी मदत आपण केली. तशीच मदत आम्हालाही करावी. आपल्यामुळे गडकरीसाहेबांमुळे नागपूर मुंबई पुणे नाशिक मेट्रो दोनसाठी मदत झाली पाहिजे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपलं सहकार्य मिळावं. यात कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं", असं अजित पवार म्हणाले.
12:51 PM
पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्याअर्थानं दाद दिली पाहिजे – अजित पवार
"देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं महाराष्ट्राच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक नगरीत मी मनापासून स्वागत करतो. मोदींच्या हस्ते आज महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन भूमिपूजन झालंय. अनेक वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती की हे प्रकल्प पूर्ण व्हावेत. हे प्रकल्प पुणे पिंपरीच्या शैक्षणिक सांस्कृतिक विकासात भर घालणारे आहेत.. पालकमंत्री या नात्यानं मोदी उपस्थित राहिले म्हणून त्यांचे आभार मानतो", असं अजित पवार म्हणाले.
12:23 PM
पुणे मेट्रो प्रवासात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना काय विचारलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करतेवेळी ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्याशी खास बातचित. मोदींनी विद्यार्थ्यांना नेमकं काय विचारलं? पाहा...
12:20 PM
MIT कॉलेजमध्ये आयोजित सभेत मोदी पोहोचले
पुण्यातील MIT महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित.
12:16 PM
काळे झेंडे दाखवून निषेध
पुण्यात नरेंद्र मोदी गरवारे ते आनंदनगर मेट्रोने प्रवास करताना राष्ट्रवादीच्या महिलांनी काळे कापड दाखवून निषेध केला#Pune#NarendraModipic.twitter.com/RqAPu6itcG
— Lokmat (@lokmat) March 6, 2022
11:58 AM
मोदींच्या पुणे दौऱ्याचे लाइव्ह प्रक्षेपण...
11:51 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे मेट्रोतून प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोचं उदघाटन केल्यानंतर त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. यात मोदींनी मेट्रोमध्ये उपस्थित शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला
11:43 AM
पुणे मेट्रोचं उदघाटन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो व गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचे उद्घाटन.
LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो व गरवारे मेट्रो स्थानकातील प्रदर्शनाचे उद्घाटन. https://t.co/PfBxFBhnpepic.twitter.com/0FTXfUTKaE
— Lokmat (@lokmat) March 6, 2022
11:40 AM
शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर मोदी पुढील कार्यक्रमासाठी रवाना
पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.
11:21 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगर पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणhttps://t.co/PfBxFBhnpepic.twitter.com/G1BAng4ejn
— Lokmat (@lokmat) March 6, 2022
11:10 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलेला खास फेटा
VIDEO: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी खास राजबिंडा फेटा तयार करण्यात आला आहे, फेट्यावरील 'राजमुद्रा' आता हटविण्यात आली आहे.#PMModiinPunepic.twitter.com/dSis2xSqon
— Lokmat (@lokmat) March 6, 2022
11:03 AM
मोदींच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून निषेध, अलका टॉकिज चौकात निदर्शनं
- काँग्रेसकडून अलका टॉकिज चौकात निषेध
- पुण्यात आज काळे कपडे आणि काळ्या मास्कला बंदी.
- मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या फेट्यावरील राजमुद्रा काढण्यात आली.
11:01 AM
असा आहे मोदींचा पुणे दौरा...
10:50 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विमानतळावर पोहोचले, स्वागताची जय्यत तयारी; पुणे महापालिकेला देणार भेट
10:30 AM
पुण्यातून LIVE: पंतप्रधान मोदींच्या पुण्यातील सभेला काळ्या कपड्यांवर बंदी...
10:26 AM
पुण्यासाठी रवाना झाल्याचं मोदींचं ट्विट
Leaving for Pune where I will be taking part in various programmes including the inauguration of the Metro Rail Project, laying the foundation stone for various development works and attending the Golden Jubilee celebrations of Symbiosis University. https://t.co/EzGbRJ36or
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2022
10:25 AM
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यात असणार एकसारख्या १२ डमी कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. देशात सर्वाधिक कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या व्यक्तींमध्ये देशाच्या पंतप्रधानांचा समावेश असल्याने व पंजाब दौऱ्यातील दुर्घटनेनंतर पुणे दौऱ्यात प्रचंड खबरदारी घेण्यात आली आहे. मोदींच्या या दौऱ्यासाठी तब्बल १२ सेम डमी कार दिल्लीवरून पुण्यात दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नेमके कोणत्या कारमध्ये आहेत याची माहिती हल्लेखोरांना कळू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते.
10:08 AM
थोड्याच वेळात पुणे विमानतळावर होणार आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार आहे.
10:07 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, 'असा' असेल पंतप्रधानांचा पुणे दौरा; क्लिक करा आणि वाचा