PM मोदी पुण्यात येणार; दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाबरोबरच लोकमान्य टिळकांना अभिवादन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:00 PM2023-07-25T15:00:12+5:302023-07-25T15:01:23+5:30

नरेंद्र मोदींना जाहीर झालेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे शरद पवारांच्या हस्ते वितरण होणार

PM narendra modi to come to Pune Along with Dagdusheth Bappa darshan Lokmanya will greet Tilak | PM मोदी पुण्यात येणार; दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाबरोबरच लोकमान्य टिळकांना अभिवादन करणार

PM मोदी पुण्यात येणार; दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाबरोबरच लोकमान्य टिळकांना अभिवादन करणार

googlenewsNext

पुणे: महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २०१८ मध्ये पाच वेगवेगळ्या भागात पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. त्यानुसार पुर्ण झालेल्या घराचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. त्यावेळी पुणे महापालिका, पिपंरी चिचंवड महापालिका, महामेट्रो आणि पीएमआरडीए यांच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन लोकापर्णचा कार्यक्रम शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, पीएमआरडीचे अधिकारी यांची बैठक झाली. लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान नरेद्र मोदी हे हेलिकॉप्टरने सिंचन भवन येथे येणार आहे. शिवाजीनगरचा शासकीय कार्यक्रम हा सर्वसामान्यांसाठी खुला असणार आहे, असे पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या देणार

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने शहरात आठ हजारहून अधिक सदनिका निर्माण करण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीत ज्यांचे घर नाही, अशा नागरिकांसाठी या प्रकल्पांमध्ये या योजनेत घरे देण्यात आली आहेत. वडगाव प्रकल्पातील सदनिकाधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या देणार आहेत.

दगडूशेठचे दर्शन घेणार

लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मोदी यांनी हा पुरस्कार स्वीकारला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतील, तसेच टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करणार आहेत.

Web Title: PM narendra modi to come to Pune Along with Dagdusheth Bappa darshan Lokmanya will greet Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.