Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:58 PM2024-11-11T12:58:37+5:302024-11-11T12:59:35+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर ते मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात येण्यास मनाई

PM narendra modi visit to Pune Changes in traffic in the city S P college area Roads closed | Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद

Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद

पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (दि. १२) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. टिळक रस्त्यावरील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार असल्याने या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

रस्ता बंद

- सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद असेल.
पर्यायी मार्ग
- वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृह मार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.
रस्ता बंद
- बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.
पर्यायी मार्ग
- वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.

नाे पार्किंग

साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

जड वाहनांना बंदी...

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर ते मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात येण्यास मनाई केली आहे. सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे), नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे), आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे), जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे), ओैंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे), बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकच्या पुढे), पाषाण रस्ता (छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे), पौड रस्ता (पौडा फाटा चौकाच्या पुढे), कर्वे रस्ता (वारजे उड्डाणपूल चौकाच्या पुढे), सिंहगड रस्ता (वडगाव उड्डाणपुलाच्या पुढे), सातारा रस्ता (मार्केट यार्ड चौकाच्या पुढे), सासवड रस्ता (बोपदेव घाटमार्गे) कोंढव्यातील खडी मशीन चौकाच्या पुढे, हडपसर ते सासवड रस्ता (मंतरवाडी फाटा ते हडपसरकडे), लोहगाव रस्ता (पेट्रोल साठा चौकाच्या पुढे) या मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: PM narendra modi visit to Pune Changes in traffic in the city S P college area Roads closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.