पीएमपीचे आणखी सहा कर्मचारी निलंबित
By admin | Published: April 27, 2017 05:15 AM2017-04-27T05:15:18+5:302017-04-27T05:15:18+5:30
कामात गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी आणखी सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
Next
पुणे : कामात गैरवर्तन केल्याच्या कारणास्तव पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी आणखी सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. नियोजित वेळेपूर्वी बस मार्गावर नेल्याप्रकरणी दोन तर तिघांनी नियोजित वेळेपेक्षा उशिरा बस मार्गावर नेल्याची आढळून आले. तर प्रवाशाकडून पैसे घेऊन त्याला एका वाहकाने तिकीट दिले नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. या सहा कर्मचाऱ्यांना कामात गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच तिकीट विक्रीपेक्षा कमी रकमेचा भरणा केलेल्या एका वाहकाची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.