पीएमपीच्या जुन्या-नव्या पासचे ‘दिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:45 AM2017-07-26T07:45:13+5:302017-07-26T07:45:15+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपी) दिव्यांगांना नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्याऐवजी पीएमपी वाहकांकडून दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढण्याचा आग्रह केला जात आहे.

PMC buses tikit rate | पीएमपीच्या जुन्या-नव्या पासचे ‘दिव्य’

पीएमपीच्या जुन्या-नव्या पासचे ‘दिव्य’

Next

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपी) दिव्यांगांना नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्याऐवजी पीएमपी वाहकांकडून दिव्यांगांना पूर्ण तिकीट काढण्याचा आग्रह केला जात आहे. मात्र, अशी कोणतीही सूचना वाहकांना देण्यात आली नसून, नवीन पास मिळेपर्यंत जुना पास ग्राह्य धरण्यात येत असल्याचे पीएमपीच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.
पीएमपीकडून दिव्यांग व्यक्तींसाठी नवीन स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. शहरात तब्बल साडेचार हजार दिव्यांग व्यक्तींकडून पीएमपी बस पास सवलत घेतली जाते. येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांना नव्या स्मार्टकार्डचे वाटप करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत पीएमपीने साडेतीन हजार पास तयार केले असून, त्यातील २१०० ते २२०० पासचे वितरण केले आहे. अजूनही निम्म्या व्यक्ती नवीन पासच्या कक्षेबाहेरच आहेत.
ज्ञानेश्वर शिंदे या दिव्यांग व्यक्तींने ‘लोकमत’कडे आपली व्यथा मांडली. मी, २० जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजीनगर ते शनिनगर या मार्गावरील बसमध्ये बसलो. मला स्वारगेटला जायचे होते. वाहकाने नवीन पास नसल्याने मला तिकीट घेण्यास भाग पाडले. गेल्या दहा दिवसांत दोनदा असा प्रकार घडला. या बाबत पीएमपीकडे तक्रार दाखल केली आहे. संयुक्त अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे म्हणाले, संघटनेकडे शिंदे यांच्यासह काही व्यक्तींनी अशाच स्वरूपाची तक्रार केली आहे. नवीन पास घेण्यासाठी येत्या ३१ जुलै पर्यंतची मुदत आहे. तोपर्यंत जुना पास ग्राह्य धरला पाहिजे. शहरातील अपंगांचे प्रमाण पाहता ही मुदत देखील प्रशासनाला वाढवावी लागेल. असे असताना नव्या पासचा आग्रह धरून दिव्यांगांना सवलत नाकारली जात आहे. तसेच तिकीट काढायला भाग पाडून इतरांसमोर अपमानित करण्यात येत आहे. दिव्यांगांना पुढील दाराने आत घेण्याची मुभा असूनही, ती वाहकांकडून नाकारण्यात येते.

पीएमपीकडून दिव्यांगांचे साडेतीन हजार स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यातील २१०० ते २२०० पासचे वितरण झाले आहे. नवीन पासची मुदत ३१ जुलै अशी आहे. त्यामुळे तोपर्यंत जुना पास चालेल. नवीन स्मार्ट कार्ड नसणाºयांना तिकीट आकारावे अशा कोणत्याही सूचना नाहीत.
- सुनील गवळी,
वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: PMC buses tikit rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.