PMC: पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:34 AM2023-12-30T11:34:49+5:302023-12-30T11:36:18+5:30

आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे...

PMC: Pay arrears of water bill, otherwise fine to be paid pune latest news | PMC: पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड

PMC: पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा भरावा लागणार दंड

पुणे : महापालिकेच्या ३९ हजार ग्राहकांकडे पाणीपट्टीची थकबाकी सुमारे ४५० कोटी रुपये आहे, पण दुबार बिल, मीटर खराब असल्याने चुकीचे बिल जाणे आदी कारणांमुळे ही रक्कम फुगली आहे. खरी थकबाकी २५० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता थकबाकीवर प्रति महिना एक टक्का व्याज लावून दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टीची थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

शहरातील व्यावसायिक व काही निवासी मिळकतींना पूर्वीपासून मीटरद्वारे पाणीपट्टीचे बिल पाठविले जात आहेत, पण अनेक वर्षांपासून पाणीपट्टी भरण्याकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मध्ये आठव्या प्रकरणात कराधान नियम ४१ नुसार थकबाकीवर प्रति महिना एक टक्के दंडात्मक व्याज आकारणीचे अधिकार महापालिकेला आहेत, पण पुणे महापालिकेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी वसुलीसाठी दंडात्मक कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. मात्र, आता ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत असणारी थकबाकी भरण्यासाठी नागरिकांना नियमानुसार ६० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या मुदतीत थकबाकी भरली नाही, तर त्यांच्यावर १ एप्रिल, २०२४ पासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

पालिकेकडून सर्व ग्राहकांना बिल देण्याची व्यवस्था केली आहे. जर बिल मिळाले नाही, तर ३१ जानेवारीपर्यंत लष्कर पाणीपुरवठा विभाग, स्वारगेट, एसएनडीटी, चतुःश्रृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालयातून बिल घेऊन जावे. थकबाकी ३१ मार्चपूर्वी जमा करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Web Title: PMC: Pay arrears of water bill, otherwise fine to be paid pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.