नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PMC मध्ये ३२० पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 07:49 PM2023-03-08T19:49:37+5:302023-03-08T19:54:42+5:30
पारदर्शक पध्दतीने होणार भरती...
पुणे :पुणे महापालिकेत एकूण ३२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालिका आस्थापनेवरील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यासाठी दि. ८ ते २८ मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
महापालिकेतील आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन दलातील रिक्त पदांसाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. पुणे महापालिकेने या आगोदर ४४८ पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. महापालिकेच्या आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. इच्छुकांना महापालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर अर्ज करता येईल.
यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये परीक्षेचे प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
ही आहेत पदे
क्ष-किरण तज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट) (८ पदे)
वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (२० पदे)
उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (१ पद)
पशुवैद्यकीय अधिकारी (२ पदे)
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर, विभागीय आरोग्य निरीक्षक (२० पदे)
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (१० पदे)
आरोग्य निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर (४० पदे)
वाहन निरीक्षक, व्हेईकल इन्स्पेक्टर (३ पदे)
औषध निर्माता (१५ पदे)
पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (१ पद),
अग्निशामक विमोचक, फायरमन (२०० पदे)
पारदर्शक पध्दतीने होणार भरती
पुणे महापालिकेत ३२० पदांची भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने होणार आहे. या पदासाठी इच्छुकांनी कुठल्याही गैरमार्गांना बळी पडू नये, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.