PMC: पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल
By राजू हिंगे | Updated: March 8, 2024 14:57 IST2024-03-08T14:55:41+5:302024-03-08T14:57:47+5:30
महापालिकेला सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे...

PMC: पुणे महापालिकेतील उपअभियंत्यांच्या ड्रॉवरमधील बंडल प्रकरणी सोमवारी अहवाल
पुणे :पुणे महापालिकेत उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून ५०० रुपयांचे बंडल सापडूले आहे. त्याप्रकरणी आयुक्त विक्रम कुमार यांनी २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. पण महापालिकेला सलग तीन दिवस सुटटया आल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे.
महापालिकेत पथ विभागात उपअभियंत्याच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवल्याचे आपचे पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्ष रविराज जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी समोर आणले. त्यावेळी त्यांनी या उपअभियंत्यास हे पैसे कोणी दिले असे सांगितल्यावर त्यांनी हे ठेकेदाराने ठेवण्यास सांगितले आहे, तो काही वेळाने घेऊन जाणार आहे असे सांगितले होते. या प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला . आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभाग प्रमुखांना याबाबतचा अहवाल २४ तासात सादर करण्याचे आदेश दिले होते. याबाबात पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर म्हणाले, महापालिकेला शुक्रवारी सुटटी आहे. सलग तीन दिवस सुटटया आल्यामुळे या प्रकरणाचा अहवाल साेमवारी सादर केला जाणार आहे.
सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा
पालिका पथविभाग केबिनमध्ये उपअभियंता याच्या टेबलांमधील रोख रक्कम प्रकरणाची चौकशी तातडीने होणे आवश्यक असताना दोन दिवस उलटून गेल्यावरही आपण अजूनही चौकशीचे आदेश दिलेले नाहीत.या प्रकरणाने महापालिकेची प्रतिमा अत्यंत मलीन झाली आहे. हा सर्वच प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पार्टी प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी सांगितले.