कात्रज भागात 2 बाेगस डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 05:42 PM2019-07-19T17:42:24+5:302019-07-19T17:43:29+5:30
परवाना नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कात्रज भागातील दाेन बाेगस डाॅक्टरांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडी : परवाना नसताना क्लिनिक चालविणाऱ्या दाेन डाॅक्टरांवर पुणे महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाने कारवाई केली आहे. काेणतेही वैद्यकीय परवाना नसताना केवळ पैशाच्या हव्यासापाेटी नागरिकांच्या आराेग्याशी दाेन डाॅक्टरांचा खेळ सुरु हाेता. याप्रकरणी बाेगस डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कात्रजमध्ये संजीवनी नर्सिंग उपचार केंद्र चालविणाऱ्या स्वागर बळीराम ताेडकर व आंबेगाव येथे जननी हाॅस्पिटल चालविणाऱ्या ए. एफ. लाेढा अशी बाेगस डाॅक्टरांची नावे आहेत. परिमंडळ तीनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक गंगाधर पखाले यांनी फिर्याद दाखल केली आहे.
महापालिकेच्या आराेग्य विभागाकडून बाेगस डाॅक्टरांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेचे आराेग्य अधिकारी तथा बाेगस वैद्यकीय व्यवसाय शाेध समितीचे सचिव डाॅ. रामचंद्र हंकारे आणि महापालिकेच्या सहाय्यक आराेग्य अधिकारी डाॅ. कल्पना बळीवंत यांच्या आदेशानुसार समितीचे सदस्य असलेले डाॅ. पखाले यांनी कात्रज भागात पाहणी केली. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास कात्रज येथील संताेषनगर येथे असलेल्या संजिवनी नर्सिंग उपचार केंद्र येथे पाहणी करण्यात आली. तेव्हा ताेडकर हे स्वतःला निसर्ग उपचार तज्ञ तसेच मनाेविकार तज्ञ म्हणून घेत आपल्या नावापुढे डाॅक्टर ही पदवी नमूद करुन वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समाेर आले. परंतु त्यांनी वैद्यकीय परिषदांपैकी एकाही परिषदेची नाेंदणी धारण केली नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्यावर वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33 (1) चे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात आंबेगाव बुद्रुक येथील समर्थ स्वरुप साेसायटी येथे जननी हाॅस्पिटलमध्ये ए. एफ. लाेढा स्वतःला पॅरेलिसीस तज्ञ म्हणून घेत स्वतःपुढे डाॅक्टर लावून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे देखील कुठल्याही वैद्यकीय परिषदेची नाेंदणी नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर देखील त्याच कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलीस अधिक तपास करीत आहेत.