पिचकाऱ्या मारणाऱ्यांना धुवायला लावला रस्ता ; पुणे महानगरपालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 08:07 PM2018-11-01T20:07:56+5:302018-11-01T20:10:50+5:30
रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्यांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाकडून कारवाई करण्यात अाली असून अनेकांना थुंकल्याचे साफ करण्याची शिक्षा देण्यात अाली.
पुणे : वारंवार अावाहन करुनही रस्त्यावर बिंधास कुठेही पान, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला अाहे. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्या 19 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दंड तर वसूल केलाच परंतु ज्यांनी दंड भरला नाही अशांना थुंकलेल्या ठिकाणाची स्वच्छता करायला लावली.
दुभाजकांवर, सार्वजनिक भिंतींवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकल्याचे नेहमीच अाढळते. महापालिकेकडून वारंवार अावाहन करुनही काही महाभाग सुधारायला तयार नसतात. त्यामुळे बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अाराेग्य विभागाने बुधवारी स्वारगेट येथील हाेलगा चाैक ते अप्पर इंदिरानगरच्या पर्यंतच्या परिसरात धडक कारवाई करुन रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड अाकारला. तसेच ज्यांनी दंड भरला नाही त्यांना जन्माची अद्दल घडावी यासाठी त्यांना थेट रस्त्याच धुण्यास सांगितला. रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 1940 रुपयांचा दंड वसूल केला.
स्वच्छ पुणे सुंदर पुणे अशी जरी महापालिकेचे घाेषवाक्य असले तरी शहरातील जवळजवळ सर्वच दुभाजकांवर तसेच रस्त्यांवर पान, गुटखा खाऊन थुंकल्याचे अाढळते. थुंकणाऱ्यांना काेणाचा धाक नसल्याने त्यांचे चांगलेच फावले हाेते. त्यामुळे रस्त्यावर, दुभाजकांवर थुंकणाऱ्या महाभागांवर महापालिकेच्या अाराेग्य विभागाने धडक कारवाईला सुरुवात केली असून जे दंड भरत नाहीत त्यांना थेट रस्ताच धुण्यासाठी सांगण्यात येत अाहे.