आचारसंहितेचा महापालिकेच्या विकास कामांनाही बसणार फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:50 PM2019-03-14T18:50:15+5:302019-03-14T18:51:00+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

PMC's development works will be stop due to election code of conduct | आचारसंहितेचा महापालिकेच्या विकास कामांनाही बसणार फटका 

आचारसंहितेचा महापालिकेच्या विकास कामांनाही बसणार फटका 

Next
ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू : शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई 

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील विकासकामांना या आचारसंहितेचा फटका बसणार आहे. ज्या ठेकेदारांना १० मार्चपूर्वी वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही अशी कामे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांना दिले आहेत. तसेच जी कामे १० मार्चपूर्वी चालू झाली आहेत, ती कामे सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. 
यासोबतच शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शासकीय कार्यालये आणि आवारातील सर्व कार्यालयीन इमारतींच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पत्रके, कट आऊट, होर्डिंग्स, बॅनर्स, झेंडे आदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर २४ तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. 
शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जावी. सार्वजनिक मालमत्तांच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर, कटआऊट, होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे आदी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेट्रीक रन, इलेक्ट्रक/टेलीफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनाधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून ४८ तासात काढून टाकण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच खासगी मालमत्तांवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती, निवडणुका जाहीर झाल्यापासून ७२ तासांमध्ये काढून टाकण्याच्याही सुचना दिलेल्या आहेत. 

Web Title: PMC's development works will be stop due to election code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.