‘पीएमपी’चे पुन्हा ब्रेकफेल
By admin | Published: December 10, 2014 11:08 PM2014-12-10T23:08:07+5:302014-12-10T23:08:07+5:30
‘पीएमपी’च्या खासगी बस ठेकेदारांकडून प्रवाशांसह पुणोकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ चौकात बुधवारी ठेकेदाराकडील बसचे ब्रेक फेल झाले.
Next
पुणो : ‘पीएमपी’च्या खासगी बस ठेकेदारांकडून प्रवाशांसह पुणोकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ चौकात बुधवारी ठेकेदाराकडील बसचे ब्रेक फेल झाले. चालकाने हँडब्रेक लावून बस थांबविल्याने मोठा अपघात टळला. तीनच दिवसांपूर्वी याच ठेकेदाराकडील बसचे पिरंगुट घाटात ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे ठेकेदारांकडून बसची नियमित देखभाल केली जाते की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात पाच खासगी ठेकेदारांच्या सुमारे 65क् बस आहेत. या बसेसची संपुर्ण देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर असते. पीएमपी प्रशासनामार्फत त्यावर नियंत्रण ठेवले जाते. मागील तीन दिवसांत ब्रेकफेलच्या दोन घटना घडल्या आहेत. बुधवारी कोथरुड डेपोची (एमएच 12, एफसी 3क्62) ही बस विद्यापीठ चौकात सिग्नलला उभी होती. ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ही बस कृषी महाविद्यालयाच्या दिशेने निघाली. त्यावेळी चालकाने बसचे एअरब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक लागत नसल्याचे पाहून त्याने तातडीने हँडब्रेकद्वारे बस नियंत्रित केली. यावेळी एका दुचाकीस्वाराला बसची धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी
झाला आहे. बस रस्त्यातच बंद पडल्याने चौकात मोठी वाहतुक कोंडी झाली होती.
अपघातावेळी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. चालकाने हँडब्रेक लावून बस नियंत्रित केल्याने मोठा अपघात टळला.
कोथरूड डेपोचे व्यवस्थापक चंद्रकांत वरपे म्हणाले, अपघाताबाबत ठेकेदाराकडून माहिती घेतली असता त्याने एअर लिक झाल्याने ब्रेक लागु शकला नाही, असे सांगितले आहे. तसेच चालकाने अपघातग्रस्त दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले होते. ठेकेदाराने गाडीचे झालेले नुकसान व उपचाराचा खर्च देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे संबंधित दुचाकीस्वाराने पोलिसांत तक्रार केली नाही. (प्रतिनिधी)