पुलावरच बंद पडली पीएमपी ; अपघाताचा धाेका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 04:36 PM2019-01-06T16:36:50+5:302019-01-06T16:37:47+5:30
वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.
पुणे : पीएमपी आणि ब्रेक डाऊन हे जणू समीकरणच झाले आहे. पीएमपीच्या बसेस सातत्याने मार्गावर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रासाला सामाेरे जावे लागते. आज दुपारच्या सुमारास वाकडेवाडीवरुन शिवाजीनगरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. बस बंद पडल्याचे कुठलेही चिन्ह लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती.
पीएमपीच्या बसेस मार्गात बंद पडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याने नाईलाजाने नागरिक खासगी वाहनाचा वापर करतात. त्यातच मार्गात बंद पडलेली बस अनेकदा लवकर बाजूला घेतली जात नसल्याने वाहतूक काेंडी हाेत असते. आज दुपारी जुन्या मुंबई पुणे हायवेवर वाकडेवाडी जवळील उड्डाणपुलावर एक पीएमपी बंद पडली हाेती. मधाेमध बंद पडल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला हाेता. त्यातच या ठिकाणी येणारी वाहने जाेरात असल्याने अपघात घडण्याची शक्यताे हाेती. बस बंद पडली असल्याचे सांगणारा कुठलाही फलक लावण्यात आला नव्हता. बसेसची झालेली दुरावस्था आणि मार्गात बंद पडणाऱ्या पीएमपी यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळत असल्याचे चित्र आहे.