पीएमपी अन् उड्डाणपुलांचे बजेट
By admin | Published: February 28, 2015 02:25 AM2015-02-28T02:25:54+5:302015-02-28T02:25:54+5:30
‘स्मार्ट सिटी’चे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणावर अर्थसंकल्पात सर्वाधिक भर देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी
पुणे : ‘स्मार्ट सिटी’चे उद्दिष्ट ठेवून सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणावर अर्थसंकल्पात सर्वाधिक भर देण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी (पीएमपी) २२८ कोटी, मेट्रोसाठी २५ कोटी, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जुने-नवे मिळून तब्बल २३ उड्डाणपूल व भुयारी मार्गासाठी मिळून २५४ कोटींची भरीव तरतूद केली आहे.
महापालिकेचा २०१५-१६चा सुमारे ४ हजार ४७९ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे यांनी मुख्यसभेत शुक्रवारी सादर केला. अर्थसंकल्पात नवीन अभिनव योजना मांडण्यापेक्षा जुने प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणाच्या प्रकल्पाबरोबरच खड्डेविरहित रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रिटीकरण, भामा आसखेड योजना, कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी व नदीसुधारणा योजनांना अर्थसंकल्पाला प्राधान्य देण्यात आले आहे.