कंत्राटी नोकरी, पगाराचे हाल होत असल्याने PMP बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:05 AM2024-03-11T11:05:25+5:302024-03-11T11:05:46+5:30
पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात शनिवारी (दि. ९) दुपारी त्याने झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला....
पुणे : सुमारे १५ वर्षांपासून कंत्राटी ड्युटी... रोज तेच काम.. तीच नोकरी, तीच जागा. सकाळी ४ वाजता डेपोत यायचे. डेपोत येऊनही ड्युटी लागत नाही. हजेरी लावूनही ड्युटीअभावी पगार मिळत नाही. या त्रासाला कंटाळून पीएमपीच्या कंत्राटी चालकाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पीएमपीएमएलच्यापुणे स्टेशन आगारात शनिवारी (दि. ९) दुपारी त्याने झाडावरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याला आगारातील इतर सहकाऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आगारातील राजकारण आणि मानसिक त्रासाने त्रस्त झालेल्या या चालकाने थेट झाडावर चढून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले. समजूत घालूनही चालक खाली उतरत नव्हता; त्यामुळे नाइलाजाने पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाला बोलवावे लागले. तब्बल तासाभराच्या प्रयत्नांनंतर चालकाला झाडावरून खाली उतरवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.