पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गरोदर महिलांच्या मदतीला धावून आले पीएमपीचे चालक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:49 PM2020-04-21T13:49:59+5:302020-04-21T13:50:49+5:30

गाडी थांबवून दवाखान्यापर्यंत पोहचवले

The PMP bus driver help to pregnant women on two separate occasions In Pune | पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गरोदर महिलांच्या मदतीला धावून आले पीएमपीचे चालक 

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गरोदर महिलांच्या मदतीला धावून आले पीएमपीचे चालक 

Next
ठळक मुद्देपीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठीच आहे व दोन्ही बसच्या चालकवाहकांनी आपले कर्तव्य पूर्ण केले

पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस, वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ही मंडळी जीव धोक्यात घालून कर्तव्य पूर्णतेसाठी झटत आहे. त्यात पीएमपीएलने देखील अत्यावश्यक सेवेसाठी बसेस उपलब्ध करुन देत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोमवारी पुण्यात पौड फाटा व पाषाण याठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये पीएमपीच्या चालकांनी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबलेल्या गरोदर महिलांसाठी गाडी थांबवून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचवण्यास मदत केली. संबधित महिलांच्या नातेवाईकांनी बसचालकांना धन्यवाद दिले.
सोमवारी  स्वारगेट आगाराकङील अत्यावश्यक सेवेतील नांदेड सिटी ते डेक्कन व्हाया कर्वेनगर या मार्गावर वाहक श्री मासुळे व चालक श्री. भोसले हे बस क्रमांक.७१८ बस घेऊन जात होते. पौडफाटा येथे बस आल्यावर त्यांना गर्दी दिसली. मंजु श्रवण गुजर या गरोदर महिलेला घेऊन तिचे नातेवाईक वाहनाची वाट पवहात होते. मात्र कोरोना संचारबंदीमुळे त्यांना एकही वाहन रस्त्यावर दिसले नाही. त्यांनी बसला हात केला व दवाखान्यात नेण्याची विनंती केली. चालकवाहकांनी लगेचच त्यांना  केईएम हाँस्पीटल रास्ता पेठ येथे नेले व त्यानंतर पुढील फेºया पुर्ण केल्या.
बाणेर फाटा येथेही असाच प्रकार झाला. बालेवाडी आगारातील वाहक परमेश्वर वामनराव पाटील व चालक.तानाजी अर्जुन देडे हे  म्हाळूंगे ते महापालिका या मार्गावर बस घेऊन जात असताना त्यांना बाणेर फाटा रस्त्यावर गर्दी दिसली. ते सर्वजण एका महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी थांबले होते व वाहन मिळत नसल्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी बसलाच हात दाखवून थांबवले.  त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चालक व वाहकांनी लगेचच नातेवाईकांसह त्या महिलेला (शिखा शैलेश कुमार) बसमध्ये बसवले व बस  बोरसे नर्सिंग होम, कोथरूड या दवाखान्यात आणली. तिथे त्या महिलेला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील फेºया पुर्ण केल्या.
पीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठीच आहे व दोन्ही बसच्या चालकवाहकांनी आपले कर्तव्य पूर्ण केले याचा संपूर्ण पीएमपीएल व्यवस्थापनाला अभिमान आहे, असे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

Web Title: The PMP bus driver help to pregnant women on two separate occasions In Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.