पीएमपी बस रस्त्यात ‘रुसली’

By admin | Published: June 12, 2016 06:02 AM2016-06-12T06:02:00+5:302016-06-12T06:02:00+5:30

वारजे माळवाडीमध्ये वारजे पुलापासून ते गणपती माथापर्यंत या एक किलोमीटर अंतरापर्यंत जवळपास तीन तास वाहतूककोंडी झाली होती. पीएमपीची बस दुपारी चारच्या दरम्यान बंद

PMP bus road 'Rusli' | पीएमपी बस रस्त्यात ‘रुसली’

पीएमपी बस रस्त्यात ‘रुसली’

Next

कर्वेनगर : वारजे माळवाडीमध्ये वारजे पुलापासून ते गणपती माथापर्यंत या एक किलोमीटर अंतरापर्यंत जवळपास तीन तास वाहतूककोंडी झाली होती. पीएमपीची बस दुपारी चारच्या दरम्यान बंद पडल्याने ही कोंडी झाली होती.
चालक-वाहकाने संबंधित विभागाकडे याबाबत तक्रार करूनही पीएमपीचे अधिकारी कोणत्याही प्रकारे मदत करण्यास तयार नव्हते. रात्री ८ वाजताही बस त्याच ठिकाणी उभी होती. त्यामुळे कर्वेनगरपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नागरिक कोंडीने प्रचंड प्रमाणात त्रासून गेले होते. या वारजे पुलापासून ते गणपती माथापर्यंत रस्तारुंदीकरण करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. डेक्कनपासून वारज्यापर्यंत आणि गणपती माथापासून शिवणेपर्यंत रस्ता मोठा झाला
आहे. फक्त वारजे पूल ते
गणपती माथापर्यंत रस्त्याचे
कमी रुंदीकरण झाले आहे.
या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अतिक्रमण काढावे अशी मागणी माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केली आहे. (वार्ताहर)

रोजच या भागात सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते ९ पर्यंत वाहतूककोंडी होत आहे. अनेक दुकानांपुढे हातगाडीचे अतिक्रमण झाले आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अतिक्रमण काढावे अशी मागणी माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.

Web Title: PMP bus road 'Rusli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.