पीएमपीने थेट विमानतळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2015 04:11 AM2015-07-24T04:11:27+5:302015-07-24T04:11:27+5:30

नागरिकांना थेट विमानतळावर पोहोचविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने (पीएमपी) कोंढवा, कात्रज, कोथरूड, पाषाण, निगडी, धायरी,

PMP directly airport! | पीएमपीने थेट विमानतळ!

पीएमपीने थेट विमानतळ!

Next

पुणे : नागरिकांना थेट विमानतळावर पोहोचविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्यावतीने (पीएमपी) कोंढवा, कात्रज, कोथरूड, पाषाण, निगडी, धायरी, हडपसर, चिंचवड येथून विशेष वातानुकूलित ४० बस सुरू केल्या जाणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीपी) अंतर्गत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, प्रवाशांना लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचविण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना रिक्षा, कॅब यावर अवलंबून रहावे लागत आहे. विमानतळावर जाणाऱ्या व तेथून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी आरटीओकडे आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळावर पोहोचविण्यासाठी विशेष सुविधा पीएमपीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांना विमानतळावर जाण्यासाठी थेट कोणतीही बस उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावर जाण्यासाठी पीएमपीएमएलने बसची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात होती. यासाठी खासगी बस कंपन्यांची मदत घेऊन पीपीपी तत्त्वावर बस उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला पीएमपी संचालकांनी मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ८ ठिकाणांहून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याकरिता ४० वातानुकूलित बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विमानतळ परिसरामध्ये या बस उभ्या करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाबरोबर चर्चा झाली असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामुळे लवकरच या बस सुरू होणार आहेत.

स्वारगेट परिसरातील पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) बसेसला सीएनजी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) बारा गुंठे जागा देण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय गुरुवारी पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या पंपावर पीएमपीच्या शंभर गाड्यांमध्ये गॅस भरण्यात येणार असून ही जागा देण्याच्या बदल्यात पीएमपीला प्रत्येक किलोमागे १ रुपया २० पैसे इतकी सवलत मिळणार आहे. त्यामुळे गॅससाठी पीएमपीचा दर महिन्याला होणारा खर्च ४ लाख रुपयांनी वाचणार असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
स्वारगेट परिसरात असलेली पीएमपीच्या मालकीची सर्वसाधारण अकरा ते साडेअकरा हजार चौरस मीटर जागा सीएनजी पंपासाठी दिली जाणार आहे. यातील ३०० चौरस मीटर जागेवर सीएनजी पंप उभारण्यात येणार असल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: PMP directly airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.