पीएमपी कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

By admin | Published: May 11, 2017 04:40 AM2017-05-11T04:40:35+5:302017-05-11T04:40:35+5:30

पीएमपीच्या सेवेत असलेल्या महापालिकेत कार्यरत असणाऱ्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांना पिंपरी महापालिकेत रुजू करून घ्यावे,

PMP employees' commissioners | पीएमपी कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

पीएमपी कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना साकडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पीएमपीच्या सेवेत असलेल्या महापालिकेत कार्यरत असणाऱ्या पावणेदोनशे कर्मचाऱ्यांना पिंपरी महापालिकेत रुजू करून घ्यावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली आहे. पीएमपी व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले
आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहनकडील (पीसीएमटी) अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग केले होते. तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे हाती घेताच महापालिकेस दिलेल्या कर्मचाऱ्यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) नितांत गरज असल्याने पीएमपीकडे वर्ग करण्यात यावे, असे पत्र पिंपरी महापालिकेला दिले होते.
त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांना पीएमपीत तत्काळ रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले. त्यानंतर देखील रुजू होण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत होते. परंतु, तुकाराम मुंढे यांनी रुजू न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचारी १३ एप्रिल रोजी पीएमपीमध्ये रुजू झाले होते. या प्रश्नावरून चिंचवड आणि भोसरीच्या भाजपा नेत्यांमध्ये मतभेदही उघड झाले होते. याबाबत कामगारांनी नेत्यांचे उंबरेही झिजविले होते. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या होत्या. मात्र, या कामगारांवरून राजकारण सुरू झाले आहे. त्यांना कोणीही वाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: PMP employees' commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.